34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeतंत्रज्ञानडेटा गैरवापर थांबविण्यासाठी आता सेफगार्ड

डेटा गैरवापर थांबविण्यासाठी आता सेफगार्ड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उद्योगाच्या विकासासाठी डेटा वापरण्याची तत्त्वे शासन निर्णय घेतील. तसेच, अनधिकृता व्यक्तींकडून गैरवापर आणि डेटाचा वापर रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली जाईल. नॅशनल ई-कॉमर्स पॉलिसीच्या मसुद्यात हे प्रस्तावित आहे. या पॉलिसीमध्ये असे म्हटले गेले आहे की, सरकार खासगी आणि गैर खासगी डेटाबाबतचे नियम तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. ही पॉलिसी सध्या चर्चेत आहे. आराखडयात असे नमूद केले आहे की, औद्योगिक विकासासाठी डेटा शेअर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. शेअरिंग व्यवस्थेसाठी डेटाचे नियमन ठरविले जाईल.

त्यात म्हटले आहे, ई-कॉमर्स, ग्राहक संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी यासारख्या उद्योगाच्या विकासासाठी डेटा वापरण्याच्या तत्त्वांवर सरकार निर्णय घेईल. त्यामध्ये कर आकारणीचा समावेश आहे जिथे ही तत्त्वे यापूर्वी अस्तित्त्वात नाहीत. तसेच डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी पुरेशा सेफगार्ड्स बनविण्यात येतील.

या आराखड्यात असे नमूद केले गेले आहे की, सरकारला असा विश्वास आहे की, डेटा ही एक महत्त्वाची मालमत्ता आहे. भारतीय युनिट्स आधी भारताची आकडेवारी वापरतील. वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत डीपीआयआयटीच्या उच्चपदस्थ अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या आंतरमंत्र्यांच्या बैठकीत या मसुद्यावर चर्चा झाली. बैठकीत असे सांगितले गेले आहे की, ई-कॉमर्स ऑपरेटरने त्यांचा वापरलेला अल्गोरिदम पक्षपात होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

ग्राहकांना माहिती मिळणे आवश्यक
त्यात म्हटले आहे की, ग्राहकांना विक्रीसाठी दिल्या जाणा-या वस्तू आणि सेवांशी संबंधित सर्व माहिती मिळणे आवश्यक आहे. संबंधित उत्पादनांच्या उत्पत्तीच्या देशाबद्दल आणि भारतात काय मूल्यवर्धन केले गेले आहे याबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती दिली पाहिजे.

विके्रत्यांना समान वागणूक
निष्पक्ष स्पर्धेसाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड सर्व विके्रत्यांना समान प्रमाणात वागणूक द्यावी. त्यात म्हटले गेले आहे की, या व्यतिरिक्त ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणा-या वस्तू बनावट नसल्या पाहिजेत. यासाठी त्यांचे रक्षण केले पाहिजे. जर ई-कॉमर्स कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून बनावट उत्पादन विकले गेले तर त्याची जबाबदारी ऑनलाईन कंपनी व विक्रेत्याची असेल.

बँकांचे खासगीकरण सरकारची घोडचूक ठरेल; रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या