30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमंगळावर नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरचे यशस्वी लँडिंग

मंगळावर नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरचे यशस्वी लँडिंग

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ७ महिन्यांपूर्वी मंगळावर पाठविलेले पर्सिव्हरन्स रोव्हरचे यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजून २५ मिनिटांनी हे पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळाच्या भूमीवर उतरले आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर उतरताच नासाच्या कॅलिफोर्नियातील जेट प्रपल्सन लॅबोरेटरीमधील सर्वांच्या चेह-यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर पाठविण्यात आले आहे. ही मोहीम आतापर्यंतची प्रगत रोबॉटिक एक्सप्लोरर आहे. हे रोव्हर २९.५५ कोटी मैलचे अंतर कापून मंगळावर दाखल झाले आहे.

एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागावर रोव्हर लँडिंग करणे हे अंतराळ विश्वातील अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. या ऐतिहासिक मोहिमेचा भाग बनलेल्या वैज्ञानिकांमध्ये भारतीय-अमेरिकन डॉ. स्वाती मोहन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉ. स्वाती मोहनसुद्धा या संपूर्ण विकास यंत्रणेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. नासाच्या डॉ. स्वाती यांनी मंगळावरील टचडाऊनची माहिती मिळाली आहे. आता तिथे जीवसृष्टीचा वेध घेण्याचे काम सुरू करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण जग हे ऐतिहासिक लँडिंग पाहत असताना कंट्रोल रुममधून स्वाती जीएन अँड सी सबसिस्टम आणि संपूर्ण प्रोजेक्ट टीम यांच्याशी समन्वय साधत होत्या.

ऐतिहासिक मोहिमेदरम्यान मुख्य सिस्टम इंजिनिअर असतानाच त्या टीमची काळजी घेतात. तसेच मिशन कंट्रोल स्टाफिंग शेड्यूलदेखील करतात. स्वाती एक वर्षाच्या असताना भारतातून अमेरिकेत गेल्या. त्यामुळे त्यांचे बालपण हे तिथेच गेले आहे. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम स्टार ट्रेक पाहिली. त्यानंतर त्यांना याबाबत कुतूहल निर्माण झाले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांना बालरोगतज्ज्ञ व्हायचे होते़ स्वाती यांनी कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये विज्ञान विषयात पदवी संपादन केली आणि एरोनॉटिक्स/एस्ट्रोनॉटिक्समध्ये एमआयटीमधून एमएस आणि पीएचडी पूर्ण केली आहे.

डॉ़ मोहन अभियानाचा भाग
डॉ. स्वाती मोहन या नासाच्या विविध महत्त्वाच्या अभियानाचा एक भाग आहेत. भारतीय-अमेरिकन वैज्ञानिकांनी कॅसिनी (शनी मिशन) आणि ग्रील (चंद्राकडे उड्डाण करणारे अवकाशयानांची जोड) प्रकल्पांवरही काम केले आहे. नासाने आपल्या ट्विटर हँडलवर मंगळावर पोहोचलेल्या रोव्हरचा फोटो शेअर केला आहे.

रोव्हर दोन वर्षापर्यंत एक्सप्लोर करेल
कॅमे-यातून आवाज आणि व्हिडिओ रेकोर्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन मायक्रोफोन्सही लावण्यात आले आहेत. पर्सिव्हरन्स रोव्हरसह दुस-या ग्रहावर जाणारे पहिले हेलिकॉप्टरदेखील आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर दोन वर्षापर्यंत एक्सप्लोर करेल. पर्सिव्हरन्स हा कमांड सेट आहे. मात्र, पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची टीम त्याला मंगळावर चालण्यास, डोंगराळ भागावर लेझर लाइट मारण्यास, नमुने जमा करण्याआधी मार्गदर्शन करेल.

इंधनदरवाढीवर भाजप मंत्र्यानेच मानले पंतप्रधानाचे आभार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या