30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उद्योगजगत टीसीएस बनली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी

टीसीएस बनली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: टीसीएस आता जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून समोर आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी टीसीएसचे बाजारमूल्य १२.५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. टीसीएसने ऍसेन्टर या आयटी कंपनीला मागे टाकले आहे. सध्या ऍसेन्टरचे बाजारमूल्य १२.१५ लाख कोटी रुपये आहे.

टीसीएसचा त्रैमासिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच कंपनीचे शेअर्स वधारले आहेत. शेअर्स नव्या विक्रमाच्या पातळीवर पोहोचले असून, केवळ कंपनीच्या प्रवर्तकच नव्हे तर गुंतवणूकदारांनाही याचा मोठा फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळात बरेच लोक वर्क फ्रॉम होम करत होते. अशा परिस्थितीत टीसीएससारख्या आयटी कंपन्यांचा खर्चात कपात झाली. लॉकडाऊन उघडल्यानंतर कंपनीला मोठ्या ऑर्डर मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच कंपनीचे बाजारमूल्य वाढले. टीसीएसचे बाजारमूल्य ५ ऑक्टोबर २०२० रोजी १० लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. सध्या ते १२.५० लाख कोटींपर्यंत वाढले आहे.

भारतीय वापरकर्त्यांशी व्हॉटस्अ‍ॅपचा भेदभाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या