33.3 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home तंत्रज्ञान भारतीय दुरसंचार क्षेत्रात टेस्लाची एन्ट्री

भारतीय दुरसंचार क्षेत्रात टेस्लाची एन्ट्री

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अब्जाधीश मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर गेल्या तीन-चार वर्षांपासून अक्षरश: राज्य केले आहे. या जिओला आता जगातील सर्वात मोठा अब्जाधीश नेस्तनाभूत करण्यासाठी येत आहे. एलन मस्क असे या अब्जाधीशाचे नाव आहे. भारतात टेस्ला कारच्या एन्ट्रीनंतर मस्क यांची स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉरपोरेशन (स्पेसएक्स) स्टारलिंक प्रोजेक्ट भारतात आणणार आहे. यानंतर भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठा भूकंप होणार आहे.

भारतात सुरुवातीच्या काळात स्पेसएक्स १०० एमबीपीएस सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस देणार आहे. कंपनी भारतात या तयारीनिशी उतरण्याची शक्यता आहे. मस्क आपल्या कंपनीचा १ ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ असलेल्या भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये विस्तार करणार आहेत. मस्क यांच्या कंपनीने भारत सरकारकडे सॅटेलाईट बेस्ड ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीची सेवा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. गेल्या वर्षी एक प्रस्ताव ट्रायने पाठविला होता. स्पेसएक्सने याला उत्तर पाठविले आहे. यामध्ये स्पेसएक्सची ंिवग सॅटेलाईट गव्हर्नमेंट अफेअर्सने हाय स्पीड सॅटेलाईट नेटवर्क भारतात सर्व लोकांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीने जोडण्याच्या लक्ष्यामध्ये मदत करू शकते, असे म्हटले आहे.

गंगा, उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्पांच्या कायमच विरोधात – उमा भारतींची स्पष्टोक्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या