23.5 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home तंत्रज्ञान सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बेपत्ता मुलाचा लागला पत्ता

सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बेपत्ता मुलाचा लागला पत्ता

एकमत ऑनलाईन

भोपाळ : २०१० मध्ये दहा वर्षांचा एक मुलगा त्याच्या बेपत्ता झाला होता. मात्र त्याला शोधण्यात एक-दोन नव्हे तब्बल १० वर्षांनी यश आले आहे. दर्पण या चेहरा ओळखणा-या सॉफ्टवेअरमुळे या मुलाला त्याचे कुटुंबीय पुन्हा भेटू शकले आहेत. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० मध्ये मध्य प्रदेशातून हा मुलगा बेपत्ता झाला होता. मात्र त्याचा शोध लागला आहे. पश्चिम बंगालच्या हावडा या ठिकाणी असलेल्या मुलांच्या एका वसतिगृहात हा मुलगा वास्तव्य करत होता. दर्पण या सॉफ्टवेअरद्वारे त्याचा शोध लागला आहे. ७ आॅक्टोबर २०१० ला हा मुलगा हरवला होता.

तेलंगण पोलिसांकडे चेहरा ओळखण्याचे एक सॉफ्टवेअर आहे. दर्पण हे त्या सॉफ्टवेअरचे नाव आहे. त्याद्वारे हरवलेल्या मुलांचा शोध घेतला जाऊ शकतो. फोटोद्वारे हा शोध घेतला जातो. जी मुले हरवली आहेत़ त्यांचा फोटो आणि त्यांची आत्ताची चेहरेपट्टी कशी आहे यावरुन हा अंदाज बांधला जातो. यामुळेच दहा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा आता दहा वर्षांनी सापडला आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यात हा मुलगा हा मध्य प्रदेशातून हरवलेला मुलगा आहे़ ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यानंतर जबलपूरमध्ये या मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. या मुलाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर आता हा मुलगा दहा वर्षांनी त्याच्या कुटुंबीयांना भेटू शकला आहे.

मार्च महिन्यात या मुलाचा शोध लागला होता. मात्र कोरोना आणि लॉकडाउन असल्याने या मुलाला हावडा येथील वसतिगृहातच ठेवण्यात आले होते़ दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १२ डिसेंबरला या मुलाला त्याच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आले.

‘शक्ती’ विधेयक विधिमंडळात सादर, महिला व बालकांवरील अत्याचारासाठी फाशी, दहा लाखाच्या दंडाची शिक्षेची तरतूद !

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या