27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeतंत्रज्ञानगुगल आणि फेसबुकने सादर केला पहिला अहवाल

गुगल आणि फेसबुकने सादर केला पहिला अहवाल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयटी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी नवीन आयटी नियमांनुसार गुगल, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आपत्तीजनक पोस्ट स्वयंचलितपणे हटविण्याविषयी आपला पहिला कम्पलाइंस रिपोर्ट पब्लिश केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे आणि ते पारदर्शकतेबाबत एक मोठे पाऊल असल्याचे सांगितले.

आयटीच्या नवीन नियमांनुसार, ५० लाखाहून अधिक युझर्ससह मोठया डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रत्येक महिन्यात मिळालेल्या तक्रारी आणि त्यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करून कम्पलाइंस रिपोर्ट पब्लिश करावा लागेल. प्रसाद यांनी ट्वीट केले की, गुगल, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या महत्त्वाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन आयटी नियमांचे होणारे पालन पाहून आनंद होत आहे. नवीन आयटी नियमांनुसार आक्षेपार्ह पोस्ट स्वयंचलितरित्या काढून टाकण्याबाबत पहिला कम्पलाइंस रिपोर्ट पब्लिश करणे ही पारदर्शकतेची एक मोठी पायरी आहे.

ट्विटरवरील दबाव वाढणार
गुगल, फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून कम्पलाइंस रिपोर्ट पब्लिश झाल्याने ट्विटरवरील दबाव वाढू शकतो, ज्यांचा नवीन नियमांवरून केंद्र सरकार बरोबर वाद सुरु आहे. देशातील नवीन आयटी नियमांचे पालन न केल्याने आणि त्यासाठी अधिका-यांची नेमणूक न केल्याबद्दल सरकारने ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती.

गुगल, इंस्टाग्राम, कु आणि फेसबुकचा समावेश
शुक्रवारी आपल्या पहिल्या मंथली कम्पलाइंस रिपोर्टमध्ये फेसबुकने म्हटले आहे की, त्यांनी देशात १५ मे ते १५ जून दरम्यानच्या १० प्रकारच्या उल्लंघनांमध्ये ३ कोटी हूनही अधिक कन्टेन्टवर कारवाई केली. इन्स्टाग्रामने याच कालावधीत सुमारे दोन कोटी पोस्ट, फोटो, व्हीडीओ आणि कमेंट्सवर कारवाई केली.

लातूर जिल्ह्यातील साडेपाच लाख नागरिकांनी घेतली लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या