25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeतंत्रज्ञानहॉटस्अ‍ॅपवरील फ्री गिफ्ट मुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता

हॉटस्अ‍ॅपवरील फ्री गिफ्ट मुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जर तुम्हाला व्हॉटस्अ‍ॅपवर एका सर्व्हेमध्ये भाग घेऊन फ्री गिफ्ट जिंकण्याचा मेसेज आला असेल, तर सावध व्हा. हा एक मेसेज चांगलाच भारी पडू शकतो. या मेसेजमुळे तुमचे बँक अकाऊंट रिकामे होण्यासह पर्सनल डेटाही चोरी होण्याचा धोका आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर फॉर्वर्ड होणा-या या मेसेजमध्ये लिहिले आहे की, ऍमेझॉनची ३० वी ऍनिव्हर्सरी सेलिब्रेशन सर्वांसाठी गिफ्ट. त्याशिवाय या मेसेजसह एक यूआरएल ही देण्यात आला आहे. मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या लिंकवर क्लिक करुन युजर्स फ्री गिफ्ट मिळवू शकतात.

सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर युजर्सच्या स्क्रिनवर अनेक गिफ्ट बॉक्स येतात. त्यानंतर सर्व्हेमध्ये भाग घेणा-या १०० लकी विनर्सला स्मार्टफोन देण्याचा दावा केला जात आहे. येथून खरी ट्रिक सुरू होते. ज्यामध्ये युजर्सला हे क्विज ५ व्हॉट्सऍप ग्रुप्स किंवा २० पर्सनल चॅटवर पाठवण्याचे सांगितले जाते़ पण युजर्सला यात कोणत्याही प्रकारचे गिफ्ट मिळत नाही.

सर्व्हे फॉर्ममध्ये मागितली जाईल महत्त्वाची माहिती
या लिंकवर क्लिक केल्यानंतर एका सर्व्हे पेजवर आणले जाईल. यात युजर्सला चार प्रश्न विचारले जातील, ज्यात दावा करण्यात आला आहे की, हे प्रश्न ऍमेझॉनची सर्विस इंप्रूव्ह करण्यासाठी विचारण्यात आले आहेत. हे प्रश्न युजर्सचे वय, लिंग, ऍमेझॉनची सर्विस कशाप्रकारे रेट केली आहे यासंबंधी असतात. तसेच, यात युजर्सच्या डिव्हाईससंबंधीही प्रश्न विचारले जातात, की ते अँड्रॉईड फोनचा वापर करतात की आयफोनचा वापर करतात. तसेच, लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी या पेजवर एक टायमरही चालवले जाते़

चुकूनही करू नका या गोष्टी
मेसेजसह देण्यात आलेल्या लिंकमध्ये ज्याप्रमाणे गिफ्ट देण्याचा दावा केला जात आहे, तो पूर्णपणे फेक आहे. कोणतीही कंपनी कोणत्याही सर्व्हेमध्ये अशाप्रकारे गिफ्ट्स ऑफर करत नाही. अशा फसव्या गोष्टींपासून वाचण्यासाठी यूआरएल लिंकवर जरुर लक्ष द्या. असे यूआरएल स्कॅमर्सद्वारा तयार केले जातात, ज्याद्वारे युजर्सची माहिती मिळवली जाऊ शकेल. त्यामुळे अशा फ्री गिफ्ट्सच्या नादात मोठ्या फसवणूकीला बळी पडू नका.

 

सीबीएसईच्या ६ वी ते १० वीची परीक्षा पद्धती, अभ्यास बदलणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या