17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeतंत्रज्ञानट्विटरने पुन्हा न्यायालयाकडे मागितला वेळ

ट्विटरने पुन्हा न्यायालयाकडे मागितला वेळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आणि भारत सरकारमध्ये असलेला तणाव इतक्यात शमण्याचे चिन्ह नाहीत. अनेकदा सवलत देऊनही ट्विटरने अनेकदा भारताच्या आयटी नियमांतर्गत तक्रार अधिका-याची नेमणूक केलेली नाही. गुरुवारी ट्विटरने दिल्ली हायकोर्टात सांगितले की, त्यांना तक्रार अधिकारी नियुक्त करण्यासाठी आणखी ८ आठवड्यांचा कालावधी लागेल. ट्विटरला दिल्ली हायकोर्टाने डेटलाईन दिली होती, ती आज संपत आहे.

कोर्टाने ट्विटरला ८ जुलैपर्यंत वेळ दिला होता. नव्या आयटी नियमानुसार तक्रार निवारण अधिका-याची केव्हा नियुक्ती करण्यात येईल़ हे ट्विटरला हायकोर्टासमोर सांगायचे होते. ट्विटरने आज कोर्टात सांगितले की, स्थानिक तक्रार अधिका-याची नियुक्ती करण्यासाठी ८ आठवडे म्हणजे २ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ट्विटरने कोर्टात असेही सांगितले की, ट्विटर भारतात एक संपर्क कार्यालय सुरु करणार आहे. भारतात ट्विटरशी संपर्क करण्यासाठी हा स्थायी पत्ता असेल.

पहिला अहवाल ११ जुलैला सादर करणार
नव्या माहिती तंत्रज्ञान संबंधातील पहिला रिपोर्ट ट्विटर ११ जुलैला सादर करणार आहे. ट्विटरने कोर्टात सांगितले की, २०२१ पासून लागू झालेल्या आयटी नियमांचे पालन करण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे. असे असले तरी त्यांना या नियमांना आव्हान देण्याचा अधिकार आहे. ट्विटर गेल्या काही दिवसांपासून तक्रार अधिका-याची नेमणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. ट्विटरने एक हंगामी तक्रार निवारण अधिका-याची नेमणूक केली होती. पण, त्याने राजीनामा दिला आहे.

राणेंना कॅबिनेट, डॉ. कराड, पाटील, पवार नवे राज्यमंत्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या