29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeतंत्रज्ञानकेंद्रीय माहिती, प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर हॅक

केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर हॅक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सायबर क्राईम आणि हॅकिंग या गोष्टींवरून सातत्याने केंद्र आणि राज्ये सरकारांची सायबर सेल हे सामान्य नागरिकांना सतर्क करत असतात. मात्र बुधवारी (दि.१२) धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हे सगळे दावे फोल ठरले. कारण खुद्द केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचेच ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकरने खात्याचे नाव देखील बदलले आणि त्यावरून काही काळ भलतेच ट्वीट्स देखील केले. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर हे अकाउंट पुन्हा रिकव्हर करण्यात आले आहे.

बुधवारी सकाळी हॅकरने हे खाते हॅक केले. खात्याचे नाव एलॉन मस्क असे ठेवून त्यावर वेगवेगळे ट्वीट देखील केले. ट्वीट्समध्ये ‘ग्रेट जॉब’ असे लिहून तो लागोपाठ ट्वीट करू लागला होता. सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंत्रालयाने हे खाते पुन्हा रिकव्हर केले. हॅकरने केलेले ट्वीट्स डिलीट करण्यात आले. तसेच, प्रोफाईल फोटो देखील पुन्हा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर ट्विटरवर रीतसर ट्वीट करून सर्वांना ही माहिती देण्यात आली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्यात आले आहे, असे ट्वीट मंत्रालयाने सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण या प्रकरणावरुन प्रत्यक्ष सरकारच्या ट्विटर अकाऊंटच्या सुरक्षिततेचा फोलपणा समोर आला, याची चर्चा दिवसभर चालू होती. साधारण सकाळी अर्ध्या तासासाठी तरी किमान हे अकाउंट हॅक झाल्याचं आता स्पष्ट झाले आहे. हॅकरने खात्याचे नाव बदलण्यासोबतच एलॉन मस्क यांचा फोटो देखील प्रोफाईलला लावला होता.

एकाच हॅकरकडून वारंवार हॅकींगचा संशय
दरम्यान, १२ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. तेही थोड्याच वेळात पुन्हा रिकव्हर केले होते. मात्र, तोपर्यंत या अकाऊंटवरून क्रिप्टोकरन्सीसंदर्भातले काही ट्वीट्स पोस्ट केले होते. ३ जानेवारी रोजी इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मान देशी महिला बँक हे तीन ट्विटर अकाउंट्स हॅक केले होते. त्यावेळी देखील एलॉन मस्क असेच नाव बदलले होते. ट्वीट्सच्या फॉण्टदेखील समान असून ‘अटअ‍ेकठॠ’ हा संदेश देखील सारखाच असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या