25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeतंत्रज्ञानवापरात नसलेले व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद होणार

वापरात नसलेले व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरात व्हॉट्सऍप हे मॅसेसिंग ऍप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र व्हॉट्सऍपनं आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. नवी पॉलिसी स्वीकारायची की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे व्हॉट्सऍपने त्याच्या प्रश्न विभागात काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत. त्यामुळे गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी न वापरली जाणारी खाती काही कालावधीनंतर निष्क्रीय केली जातील असे सांगितले आहे़ यासाठी त्यांनी कालावधी निश्चित केला आहे.

या कालावधीत व्हॉट्सऍपचा वापर न केल्यास तो कालावधी यासाठी ग्रा धरला जाईल आणि त्यानंतर व्हॉट्सऍप खाते कायमस्वरूपी बंद केले जाईल. खाते निष्क्रिय करण्यासाठी अटी असणार आहेत. एक तर खाते कायमस्वरूपी बंद केले जाईल आणि त्याचा पूर्ण डेटा सर्व्हरमधून कायमस्वरूपी डिलीट केला जाईल. दुसरे काही कालावधीसाठी व्हॉट्सऍप बंद केले आणि पुन्हा त्याच डिव्हाईसमध्ये त्या फोन नंबरने नोंदणी केली तर मात्र त्याला आपला डेटा पुन्हा मिळवता येणार आहे.

खाते १२० दिवस न वापरल्यास बंद
व्हॉट्सऍप खाते १२० दिवस वापरले गेले नाही तर ते खाते बंद केले जाणार आहे. याबाबतची माहिती व्हॉट्सऍपने दिली आहे. खाते इटरनेटशी कनेक्ट नसल्यास ते निष्क्रिय असल्याचे गृहीत धरले जाणार आहे. सुरक्षितता, डेटा मर्यादा आणि गोपनीयता यांचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निष्क्रिय म्हणजे वापरकर्ता व्हॉट्सऍपशी कनेक्ट नाही, असे गृहीत धरले जाईल.

तर ४५ दिवसांनी होणार कायमस्वरुपी बंद
४५ दिवस खाते निष्क्रिय राहिल्यास आणि तो मोबाईल नंबर इतर डिव्हाईसमध्ये दिसल्यास खाते कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. तो नंबर इतर कुणीतरी वापरत असल्याचे ग्रा धरले जाईल. त्यामुळे व्हॉट्सऍप जुन्या खात्यातील सर्व डेटा डिलीट करेल. त्यात प्रोफाईल फोटोपासून इतर बाबींचा समावेश आहे

इंटरनेट वापरात गावे शहरांना मागे टाकणार!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या