21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home तंत्रज्ञान भारतीय वापरकर्त्यांशी व्हॉटस्अ‍ॅपचा भेदभाव

भारतीय वापरकर्त्यांशी व्हॉटस्अ‍ॅपचा भेदभाव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : व्हॉट्सऍप यूरोपीयन वापरकर्ते आणि भारतीय वापरकर्ते यांच्यामध्ये भेदभाव करीत असल्याची स्पष्टोक्ती केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली़ नव्या धोरणावरून केंद्र सरकार आणि व्हॉट्सऍपमधील याचिकेवर सुनावणीदरम्यान सदर खुलासा करण्यात आला आहे़ व्हॉट्सऍप आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले आहे. आता व्हॉट्सऍपने एक नवीन धोरण आणले असून, त्या धोरणाचा सामान्यांनी धसका घेतला आहे. व्हॉट्सऍपच्या या धोरणाने मित्र आणि कुटुंबीयांसह वापरकर्त्यांच्या (युजर्सच्या) संदेशांच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. व्हॉट्सऍपच्या नव्या गोपनीय धोरणावरून दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सोमवार दि़ २५ जानेवारी या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकराने म्हटले की, गोपनीय धोरणाबाबतीत व्हॉट्सऍप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करत आहे.

केंद्र सरकारने आरोप केला आहे की, युरोपातील युजर्सच्या तुलनेत व्हॉट्सऍप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करत आहे. दोन्ही युजर्सशी वेगवेगळा व्यवहार केला जातोय. सरकारसाठी हा चिंतेचा विषय असल्याने सरकार याकडे पूर्ण लक्ष देत आहे. फेसबुकच्या मालकीचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍपच्या नवीन गोपनीयता धोरणाविरूद्ध एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्यासमोर सरकारची बाजू मांडली. या सुनावणीदरम्यान शर्मा यांनी कोर्टाला सांगितले की भारतीय वापरकर्त्यांचा डेटा फेसबुकसह अन्य कंपन्यांसोबत शेअर केला जाणार आहे. परंतु ही पॉलिसी नाकारण्याचा पर्याय दिलेला नाही. अटी आणि शर्ती मान्य करा अन्यथा व्हॉट्सऍप वापरता येणार नाही, असे नव्या गोपनीयता धोरणात म्हटले होते.

१ मार्चच्या सुनावणीत व्हॉट्सऍप उत्तर देणार
व्हॉट्सऍपच्या या नव्या धोरणामुळे वापरकर्त्यांना सौदेबाजी करण्यास भाग पाडले जात आहे, ज्यामुळे युजर्सच्या गोपनीयतेमध्ये आणि माहितीच्या सुरक्षेमध्ये ढवळाढवळ केली जाऊ शकते. त्याचवेळी या प्रकरणात व्हॉट्सऍपच्या वतीने उपस्थित ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितले की, त्यांना सरकारकडून माहिती मिळाली आहे आणि त्याचे उत्तरही व्हॉट्सऍपकडून दिले जाणार आहे. या प्रकरणावर १ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

युरोप आणि आफ्रिकेतील युजर्सना स्पेशल ट्रिटमेंट?
व्हॉट्सऍप नवीन धोरणानुसार त्यांच्या वापरकर्त्यांचा (युजर्सचा) डेटा फेसबुक आणि इतर संबंधित कंपन्यांसोबत सामायिक (शेअर) करेल. वापरकर्त्यांना हे नवीन गोपनीयता धोरण अनिवार्यपणे स्वीकारावेच लागेल. नवीन धोरणाबद्दल व्हॉट्सऍपचे युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील धोरणांचे संचालक नियाम्ह स्वीनी असे म्हणतात की, युरोपियन वापरकर्त्यांना फेसबुकवर वैयक्तिक डेटा सामायिक करण्यास भाग पाडले जाणार नाही. ते म्हणाले की व्हॉट्सऍपच्या नवीन धोरणात ते वापरकर्त्यांचा डेटा कसा आणि का वापरतात हे स्पष्टपणे सांगितले गेले आहे. आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशन सहमत असेल तेव्हाच युजर्सचा डेटा फेसबुक आणि इतर कंपन्यांशी सामायिक करेल.

अर्णबनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या