25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeतंत्रज्ञानव्हॉट्सअ‍ॅप गोपनीय धोरण; सुनावणी १५ मार्चला

व्हॉट्सअ‍ॅप गोपनीय धोरण; सुनावणी १५ मार्चला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : व्हॉट्सऍपद्वारे व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसी सुधारित करण्याच्या विरूद्ध आदेशाची मागणी करणा-या याचिकेबाबत अहवाल सादर करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्राला मुदतवाढ दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांना असे सांगितले होते की, एकतर तुमचा डेटा फेसबुकवर शेअर करण्यास सहमती द्या अन्यथा ८ फेब्रुवारीनंतर खाते बंद केले जाईल. मात्र, जोरदार विरोधानंतर व्हॉट्सअ‍ॅपने हे धोरण १५ मे पर्यंत पुढे ढकलले.अ‍ॅडव्होकेट चैतन्य रोहिला यांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, हे नवीन धोरण खासगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन करते आणि कोणालाही कोणत्याही सरकारी देखरेखीशिवाय एखाद्या व्यक्तीची ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटी जाणून घेण्याची परवानगी देते.

याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान जस्टिस संजीव सचदेवा यांनी सरकारला १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच या प्रकरणाशी संलग्न व्यक्तींना नोटीस देण्यास इन्कार केला आहे. याआधी नवीन प्रायव्हसी पॉलिसीशी संलग्न प्रकरणात चीफ जस्टिस डी. ए. पटेल यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस बजावली होती. या प्रकरणातील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे.

सरकारचे व्हॉट्सअपला आदेश
व्हॉट्सऍपच्या नवीन धोरणानंतर सरकारने कंपनीला असे आदेशही दिले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत ते वापरकर्त्यांचा डेटा शेअर करणार नाही किंवा तृतीय पक्षाच्या ऍप्सवर कोणताही करार करणार नाही. कारण व्हॉट्सऍप सतत वादाच्या भोव-यात असतो. आतापर्यंतच्या धोरणामुळे कंपनीला खूप त्रास सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सऍपने हे स्पष्ट केले आहे की, ते वापरकर्त्यांचा डेटा कोणाबरोबरही शेअर करत नाही. तसेच वापरकर्त्यांचे लोकेशन किंवा इतर कोणत्याही गोष्टी ट्रॅक करीत नाही.

व्हॉट्सअप स्टेटसमध्ये देतेय स्पष्टीकरण
काल व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या स्मार्टफोन यूजर्सच्या फोनवर जाऊन स्टेटस अपडेट केले. यात कंपनीला वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची काळजी आहे अशी माहिती वापरकर्त्यांना देण्यात आली. त्याच वेळी असेही म्हटले गेले होते की कंपनी संदेश पाहत नाही किंवा ती फेसबुकसोबत शेअर करत नाही.

केवळ व्हॉट्सअपच नाही तर अन्य अ‍ॅप्सही करतात ट्रॅक
फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या ट्रॅकिंगबाबत हायकोर्टाने म्हटले आहे की, केवळ व्हॉट्सअ‍ॅपच नाही तर इतर अ‍ॅप्सदेखील तुमचा डेटा संकलित करतात. आपण गुगल नकाशे वापरत असाल तर आपल्याला हे माहित असले पाहिजे की, हे अ‍ॅप आपला डेटा संकलित करते.

लिव्ह इन’मधील १०५ जोडपे अडकले विवाह बंधनात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या