नवी दिल्ली : गोपनीयतेसंबंधी अटी आणि धोरणांबाबतची पॉलिसी व्हॉट्स अॅपने पुन्हा आणली असून, गुरुवारी ती जाहीर केली आहे. गोपनीयतेसंबंधीच्या अटी आणि धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी युजर्सचा गोंधळ होऊ नये यासाठी शब्दांचा काळजीपूर्वक वापर केला आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये एका छोट्या बॅनरखाली आपली नवीन पॉलिसी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. १५ मेपर्यंत ही पॉलिसी स्वीकारावी लागणार आहे. व्हॉट्स अॅपची नवी पॉलिसी आल्यानंतर जगभरातून त्यावर टीका झाली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपसोडून अन्य अॅपवर शिफ्ट होण्याचे प्रमाण वाढले होते. भारतीय युजर्सनी टेलिग्रामचा पर्याय निवडला होता. त्यानंतर ही पॉलिसी लागू करण्याची तारीख पुढे ढकलली होती. टीका झाल्यानंतर आणि तोटा सहन करूनही कंपनीने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केलेला नाही. कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.
इतर अॅप्सच्या वापरकर्त्यांत वाढ
व्हॉट्सअॅपने सादर केलेल्या पॉलिसीत म्हटले आहे, मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच, नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे. खासगी मेसेज आधीप्रमाणेच एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. दरम्यान, नवीन पॉलिसी आणल्यापासून व्हॉटस अॅपला रामराम करत सिग्नल, टेलिग्राम आणि संदेश यांसारख्या अॅप्सवरील युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे.
गलवान संघर्षात आमचे सैनिक मारले गेलेत; चीनची अधिकृतरित्या कबुली