17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeतंत्रज्ञानव्हॉट्सऍप नरमला

व्हॉट्सऍप नरमला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : व्हॉट्सऍप आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचे दिसते आहे. शुक्रवारी व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की व्यक्तिगत माहिती संरक्षण विधेयक लागू होईपर्यंत ते नवीन प्रायव्हसी पॉलिसी वापरकर्त्यांना लागू करण्यास भाग पाडणार नाही.

व्हॉट्सऍपने उच्च न्यायालयात सांगितले की, हे नवीन गोपनीयता धोरण न स्विकारणा-या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सऍप वापरण्याची मर्यादा नसणार आहे. व्हॉट्सऍपने मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्यासमोर नवीन धोरण न स्विकारणा-या वापरकर्त्यांवर कोणतीही मर्यादा आणणार नसल्याचे स्पष्ट केले.

इन्स्टंट मेसेंिजग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍपची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले, आम्ही स्वेच्छेने ते (धोरण) रोखण्यासाठी मान्य केले आहे. आम्ही लोकांना ते स्वीकारण्यास भाग पाडणार नाही. साळवे म्हणाले की व्हॉट्सऍप अजूनही आपल्या वापरकर्त्यांना अद्ययावत सेवा देत राहील.

वापरकर्त्यांवर निर्बंध लादले जाणार नाहीत
व्हॉट्सऍपने म्हटले आहे की व्यक्तिगत माहिती संरक्षण विधेयक लागू होईपर्यंत कंपनी आपल्या वापरकर्त्यांना नवीन गोपनीयता धोरण स्विकारण्यास भाग पाडणार नाही. यासह, कंपनीने असेही म्हटले आहे की नवीन गोपनीयता धोरण न पाळणा-या ग्राहकांवर कोणतेही बंधन किंवा निर्बंध लादले जाणार नाहीत.

केरळमध्ये आणखी १४ जणांना झिकाची लागण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या