28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home तंत्रज्ञान मोबाईल निर्मितीत चीनला मागे टाकणार

मोबाईल निर्मितीत चीनला मागे टाकणार

भारताचे लक्ष्य ; केंद्र सरकारची योजना तयार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताला मोबाईल निर्मितीमध्ये जगातील सर्वात मोठा देश बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असून याबाबतीत चीनला मागे टाकण्यासाठी योजनाही केंद्रसरकारने बनविली आहे, अशी माहिती केंद्रिय माहिती व प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

फिक्की या औद्योगिक क्षेत्रातील मार्गदर्शक संघटनेच्या वार्षिक संमेलनात प्रसाद यांनी उद्योजकांना संबोधित केले. मोबाईल निर्मिती क्षेत्रातील सरकारच्या भावी योजना व उद्दीष्टांची माहिती दिली. उत्पादनाधारित प्रोत्साहन योजनेनुसार (पीएलआय) जगभरातील मोबाईल उत्पादक कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. मोबाईल निर्मिती क्षेत्रात भारत २०१७ साली जगातील चीननंतरचा दुसरा देश ठरला होता. काही वर्षात चीनला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावण्याचा भारताचा प्रयत्न आहे. केवळ मोबाईलच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती क्षेत्रात भारताला सर्वात मोठा देश बनविण्याचाही प्रयत्न असणार आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादननिर्मितीचा व्यवसाय २६ लाख कोटींपर्यंत वाढविणार
इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मितीचा व्यवसाय २०२५ पर्यंत २६ लाख कोटींच्याही पुढे नेण्याचे उद्दीष्ट आहे. त्यातील निम्मा वाटा म्हणजे १३ लाख कोटींचा हिस्सा मोबाईलनिर्मितीमधून यावा, असे नियोजन आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. सरकारद्वारे जाहीर केलेल्या पीएलआय योजनेतून लाभार्थी कंपन्यांना तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचा लाभ होऊ शकतो, असेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

कृषि कायद्यांमुळे देशात महागाई वाढेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या