23.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeमहाराष्ट्रविटांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १ ठार

विटांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १ ठार

नागपूर : जिल्‘ातील एका विटांच्या कारखान्यात मंगळवारी (६ ऑगस्ट) पहाटे स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मौदा तालुक्यातील युनिट येथे ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘श्री जी ब्लॉक’ या खासगी कारखान्यात हा स्फोट झाला. येथे सिमेंटच्या मोठ्या विटी बनवण्याचे काम केले जाते.

एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले की, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास मौदा तालुक्यातील झुल्लर गावात असलेल्या विटा बनवण्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला. त्यामुळे कारखान्याचे टिन शेड खाली कोसळले. या स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. नऊ कामगार जखमी आहेत.

नंदकिशोर करंडे असे मृतकाचे नाव आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR