सोलापूर : सोलापूरचा महापौर कोण होणार याबाबत प्रसारमाध्यमांवर अनेक नावे चर्चिली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर कोण होणार हे पालकमंत्री व शहराध्यक्ष हेच ठरवतील, अशी स्पशटोक्ती गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी केली.
गुरुवारी राज्यभरातील महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. सोलापूर महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने महापौर कोण होणार याविषयी प्रसारमाध्यमात चर्चा सुरू झाली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांचे मेव्हणे विनायक कोंड्याल, चुलत भाऊ प्रथमेश कोठे यांची नावे प्राधान्याने चर्चेत आहेत. तसेच नरेंद्र काळे, अनंत जाधव, किरण देशमुख, सात्विक बडवे यांच्या नावावर ही चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी चर्चा केली.
विनायक कुंडल हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. सलग चार वेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव पुढे असल्याची चर्चा असल्याचे आ. कोठे यांना सांगितल्यावर त्यांनी त्यांचे व प्रथमेश कोठे यांचे नाव चर्चेत असलेले मी आपल्याकडून ऐकत आहे, असे सांगून आश्चर्याचा धक्का दिला. तसेच भाजपा धक्का तंत्र अवलंबणारा पक्ष आहे. भाजपचा सोलापुरातील महापौर कोण होणार हे पक्ष ठरवेल. सोलापूरच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे व प्रदेश पातळीवरील नेते हेच या बाबतीत निर्णय घेतील. ते ज्या नावाला अनुकूलता दर्शवतील त्यांना सर्वांना पाठिंबा द्यावा लागेल असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रारंभी पासूनच आमदार देवेंद्र कोठे यांच्या करानुसार सर्व विवरचना पालकमंत्री गोरे यांनी आखली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सध्या अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व शहर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे यांच्या मतांना प्राधान्याने विचारात घेण्याकडे कल ठेवला आहे.
अक्कलकोटच्या नगराध्यक्षपदी आमदार करण्यासाठीच्या भावाला संधी देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आमदार करण्यासाठी यांच्या पत्नी व भावाला उमेदवारी देण्यात आली आहे. तसाच प्रकार सोलापुरातही होणार का याची शक्यता बोलली जात आहे. परिणामी विनायक कोंड्याल व प्रथमेश कोठे या दोघांची नावे महापौर पदाच्या स्पर्धेत सर्वात पुढे असल्याचा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.

