Homeराष्ट्रीयतामिळनाडूत 'थलापती' पर्व! वडिलांनी आखली रणनीती, निवडणूक प्रचारातील 'त्या' आश्वासनाचे काय होणार?

तामिळनाडूत ‘थलापती’ पर्व! वडिलांनी आखली रणनीती, निवडणूक प्रचारातील ‘त्या’ आश्वासनाचे काय होणार?

चेन्नई: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत प्रस्थापित द्रविडी राजकारणाला सुरुंग लावला आहे. या विजयानंतर आता विजयचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर (SAC) यांनी मोठी घोषणा करत सत्तेची समीकरणं स्पष्ट केली आहेत.

वडिलांनी खोलला सत्तेचा ‘पत्ता’
निवडणूक निकालांच्या कलांनुसार, टीव्हीके (TVK) पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवताना काही जागांची ओढताण जाणवत आहे. अशा परिस्थितीत एस. ए. चंद्रशेखर यांनी सत्तेचा पहिला पत्ता खोलला आहे. त्यांनी काँग्रेसला उघडपणे पाठिंबा देण्याचे आणि सोबत येण्याचे आवाहन केले आहे. “तामिळनाडूतील जनतेला बदल हवा होता आणि त्यांनी माझ्या मुलावर विश्वास दाखवला आहे. आता स्थिर सरकारसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे संकेत चंद्रशेखर यांनी दिले आहेत.

निवडणूक प्रचारातील ‘तो’ शब्द पूर्ण होणार?
निवडणुकीच्या रणधुमाळीत थलापती विजयने जनतेला अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी सर्वात चर्चेत राहिलेला शब्द म्हणजे ‘भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन’.महिलांना दरमहा २५०० रुपये: विजयने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. ५ एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा शब्द दिला होता. सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे आणि विनामूल्य आरोग्य सुविधा पुरवणे हे त्याचे मुख्य अजेंडा होते.

आता विजय सत्तेच्या उंबरठ्यावर असताना, हे दिलेले शब्द तो पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करणार का? याकडे संपूर्ण तमिळनाडूचे लक्ष लागले आहे.
विजयानंतर वडिलांची भावूक प्रतिक्रिया

आपल्या मुलाच्या या यशाने एस. ए. चंद्रशेखर भावूक झाले आहेत. ते म्हणाले, “विजयचा हा विजय ऐतिहासिक आहे. त्याने कोणाशीही युती न करता स्वबळावर ही लढाई लढली, याचा मला अभिमान आहे. तमिळनाडूच्या लोकांसाठी त्याच्या मनात खूप मोठी स्वप्ने आहेत आणि तो ती नक्कीच पूर्ण करेल.”

राजकीय भूकंपाची शक्यता
विजयच्या या एन्ट्रीमुळे डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) यांसारख्या दिग्गज पक्षांच्या वर्चस्वाला मोठा फटका बसला आहे. जर विजयने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली, तर दक्षिण भारताच्या राजकारणात एक नवीन युगाची सुरुवात होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR