Homeक्रीडातो लय बेक्कार मारतो!

तो लय बेक्कार मारतो!

मुकुल चौधरीच्या खेळीवर अर्जुनची प्रतिक्रिया

मुंबई : आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील रंगतदार सामन्यात मुकुल चौधरीच्या रुपात नव्या हिरोने सुपर हिट ट्रेलर रिलीज केला. लखनौच्या संघाकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुकुलने वादळी खेळी करत हातून निसटलेल्या सामन्यात एलएसजीच्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. पहिल्या दोन सामन्यात एकही षटकार न मारणा-या २१ वर्षीय बॅटरने ७ गगनचुंबी षटकार मारले. आयपीएलमधील त्याच्या वादळी खेळीनंतर नव्या संघाकडून पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जुन तेंडुलकरचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मुकुल चौधरीमध्ये षटकारांच्या आतषबाजीसह आयपीएल स्पर्धा गाजवण्याची क्षमता आहे असे अर्जुन तेंडुलकर एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

शुभंकर मिश्रा यांच्या खास पॉडकास्ट शोमध्ये अर्जुन तेंडुलकर अनेक विषयावर गप्पा गोष्टी करताना दिसला होता. यावेळी नेट्स प्रॅक्टिस दरम्यान गोलंदाजी करताना छरॠ च्या संघातील कोणत्या खेळाडूंमध्ये धमक दिसली? कोण आगामी दोन वर्षांत लखनौच्या संघाकडून आयपीएल स्पर्धा गाजवेल, असे वाटते? असा प्रश्न अर्जुन तेंडुलकरला विचारण्यात आला होता. यावर अर्जुन तेंडुलकरने मुकुल चौधरीचे नाव घेतल्याचे पाहायला मिळाले होते. तो म्हणाला होता की मुकुल चौधरीचे षटकार पाहून प्रभावित झालो. तो मैदानातील कानाकोप-यात उत्तुंग फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे. प्रॅक्टिस मॅचमध्ये त्याने स्क्वेअर लेग, पॉइंटच्या आणि अपर कटसह षटकार मारल्याचा उल्लेख करत यंदाच्या हंगामात मुकुल चौधरी लक्षवेधी ठरेल असे अर्जुन तेंडुलकरने म्हटले होते. मुकुल चौधरीच्या धमाकेदार शोनंतर अर्जुन तेंडुलकरची या युवा स्टार संदर्भातील वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR