युतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना

मुंबई : अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप- शिंदेसेनेची युती होणार असून नेत्यांच्या चर्चेच्या फे-या सातत्याने होत आहे. मात्र, जागा वाटपासंदर्भात एकमत वजा अंतिम निर्णय होत नाही. त्यामुळे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर व चंद्रपूर महापालिकेत युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी युतीतील वरिष्ठ नेत्यांची नागपूर येथे बैठक पार पडली असून यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आ. संजय कुटे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यासह भाजप, शिंदेसेनेचे नेते उपस्थित होते. मात्र ही बैठकही फिस्कटली असून महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना.

अमरावती महापालिकेत शिंदेसेनेने ४२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तर, भाजपचा मित्र असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीलाही जागा सोडाव्या लागणार आहे. अमरावती महापालिकेचे २२ प्रभागात ८७जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. तर भाजपने ५५ प्लस हे लक्ष्य निर्धारित करून पुन्हा सत्ता स्थापनेसाठी रणनीती आखली आहे. शिंदेसेनेच्या नेत्यांनी जागेचा दिलेला प्रस्ताव बघता हा तिढा स्थानिक पातळीवर नेत्यांच्या आवाक्याबोहर जात असल्याने आता हा निर्णय युतीचे वरिष्ठ नेते घेणार आहे. अमरावती मनपात शिंदेसेनेला ७ तर युवा स्वाभिमानला १५ जागा देण्याची तयारी भाजप नेत्यांनी दर्शविल्याची विश्वसनीय माहिती आहे.

मतांचे विभाजन टाळण्यासाठी खटाटोप
हिंदू मतांचे विभाजन होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. त्याकरिता शिंदेसेना सोबत घेऊन अमरावती महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे. तर, भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असली तरी हिंदू मतांच्या विभाजनाचा फटका बसू नये, यासाठी शिंदेसेना, युवा स्वाभिमान पार्टी अशी युती करण्याची तयारी आहे.

एबी फॉर्म थेट निवडणूक अधिका-यांकडे
भाजपने बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर रोजी निवडणूक अधिका-यांकडे भाजप उमेदवारांचे एबी फॉर्म देण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे इच्छुक भाजप उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एका प्रभागात अमूक जागेसाठी चार उमेदवारांनी नामांकन अर्जात राजकीय पक्ष भाजप असा उल्लेख केला असल्यास एबी फॉर्म हा एकाच्याच नावाचा असणार आहे. त्यामुळे आपसूकच अन्य तीन उमेदवारांचे अर्ज रद्द होऊन ते रिंगणा बाहेर होतील आणि निवडणूक लढविता येणार नाही, अशी माहिती आहे.

कर थकीत असल्यास अर्ज होणार रद्द
महापालिका निवडणुकीत नामनिर्देशनपत्र सादर करताना उमेदवारांना मालमत्ता कर आणि पाणीपुरवठ्याचे देयके थकीत ठेवता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिका-यांच्या लक्षात आल्यास संबंधित उमेदवारांचे नामांकन रद्द करण्याची तरतूद आहे. उमेदवारी अर्जासोबत कर भरल्याची पावती जोडावी लागणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news