16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeराष्ट्रीयसेनेने युध्दासाठी सज्ज असावे

सेनेने युध्दासाठी सज्ज असावे

सीडीएस चौहान यांचे आवाहन युद्धाचे मार्ग दररोज बदलतायेत

नवी दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान म्हणाले की, युद्ध स्वत:ला सतत बदलत आणि घडवत असते. ज्या संकल्पना भविष्यातील वाटतात, त्या लागू होण्यापूर्वीच जुन्याही होऊ शकतात. हा एक असा धोका आहे जो सैन्याला पत्करावा लागतो. त्यामुळे, भविष्यातील युद्धाच्या पद्धतीनुसार अंदाज लावणे, तयारी करणे हे आपल्या अस्तित्वाशी जोडले जाते. याला दुसरा कोणताही पर्याय नाही.

सीडीएस चौहान यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील सॅम मॉनेकशॉ सेंटरमध्ये सुरू असलेल्या चाणक्य डिफेन्स डायलॉगमध्ये हे विचार मांडले. ते फ्युचर वॉर्स: मिलिटरी पॉवरच्या माध्यमातून स्ट्रॅटेजिक पोस्चरिंग या विषयावर बोलत होते. यापूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चाणक्य डिफेन्स डायलॉगच्या उद्घाटन सत्रात सहभागी झाल्या होत्या. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मुख्य भाषण दिले. चाणक्य डिफेन्स डायलॉगच्या पहिल्या दिवशी तीन विशेष थीमॅटिक सत्रे देखील झाली, ज्यात वरिष्ठ धोरणकर्ते, संरक्षण नेते, सामरिक तज्ज्ञ आणि उद्योगातील तज्ञ सहभागी झाले होते.

या दरम्यान अनेक प्रकारच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली, ज्याची सुरुवात ऑपरेशन सिंदूर एक सार्वभौम सामरिक विजय याने झाली, त्यानंतर बदलती स्थिती: संरक्षण सुधारणा आवश्यक करणे आणि नागरी-लष्करी एकीकरण: बदलाचे चालक या सत्रांनी समारोप झाला. प्रत्येक सत्रात राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण परिवर्तन आणि भारताच्या सामरिक भूमिकेतील आजची आव्हाने व भविष्यातील मार्गांवर चर्चा करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR