लातूर : प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हण यांनी लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर येथे सोमवारी आयोजित बुथ कार्यकर्त्याच्या मेळाव्यात अकलेचे तारे तोडले. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा लातूरकरांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपाच्या सत्तेचा माज बोलतोय. भाजपाचा हा माज उतरवला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रीया लाूतरकरांमधून उटत आहे.
साहेबांच्या आठवणी पुसू शकणारा पैदा झाला नाही
– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा संताप
लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी पैदा झाला नाही आणि होणारही नाही, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला सुनावले.अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केले. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते काहीही बरळत आहेत. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचे लातूरशी असलेले नाते. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप
लातूर म्हणजे लोकनेते विलासराव देशमुख असे समीकरण आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसमधून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लातूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत असल्याने लातूर येथील मेळावा संपताच रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलणे टाळत तात्काळ निघून जाणे पसंत केले.
महाराष्ट्राची ओळख कशी पुसेल रे मुर्ख माणसा
संपूर्ण महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात विलासरावजी देशमुख यांच्या आठवणी, विचार आणि ओळख आजही जशासतशी आहे. एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट ओळखतो. एखाद्या वडीलधारी व्यक्तीबद्दल रविंद्र चव्हाण यांची अक्कल अशी चालणार असेल तर ते स्वत:च्या वडीलाची नक्कीच इज्जत करीत नसतील, असे त्यांच्या वक्त्यावरुन दिसून येते. सत्तेची घमेंड रविंद्र चव्हाण याच्या तोंडातून बाहेर पडत आहे. सत्ता येते आणि जातेही. सत्तेचा माज चढला की माणुस पशुसारखा वागतो. हेच रविंद्र चव्हाण याच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. विलासराजींना संपूर्ण महाराष्ट्र माणतो. विलासरावजी म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे. ती ओळख कशी पुसेल रे मुर्ख माणसा. खरे तर या मुर्खाला जोड्याचा प्रसाद दिला पाहिजे.- मोईज शेख.
अज्ञान आणि सत्तेची गुर्मी
रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा मी जाहिर निषेध करतो. कर्तव्यनिष्ठ, कर्मयोगी, महाराष्ट्र प्रेमी, विकास पुरुष असलेले आदर्श राज्यकर्ते म्हणून महाराष्ट्रभर ख्याती असलेले लोकप्रिय आणि वक्तृत्वप्रभू, अशा नेत्याच्या राजकीय उंचीचे आकलन न झाल्यामुळे अज्ञानापोटी आणि सत्तेची गुर्मी चढल्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले आहे.-प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर.
रविंद्र चव्हाण बुद्धीचे दिवाळे निघालेला व्यक्ती
मुळातच रविंद्र चव्हाण हा भाजपाचा धार्मांध पोपट आहे. त्यांना महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची जडघडणीचा इतिहास माहित नाही. शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, भाई उद्धवराव पाटील, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख आणि असंख्य कर्तबगार नेत्यांनी महाराष्ट्र घडवला. रविंद्र चव्हाणसारख्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाने स्वत:च्या बुद्धीचे दिवाळे काढून घेतले. त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध तर आहे. परंतु, या बुद्धी नसलेल्या माणसाच्याविरोधात महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.- अॅड. उदय गवारे.
एखाद्याचे अस्तित्व संपण्याचे विलासरावजींचे राजकारण नव्हते
विलारावजी देशमुख यांनी सुसंस्कृत राजकारण केले. त्यांच्या सुसंस्कृत राजकारणात त्यांनी कधीच विरोधकांचा अशा पद्धतीने उल्लेख केला नव्हता. एखाद्याचे अस्तित्व संपण्याचे राजकारण विलारावजी देशमुख यांनी कधीच केले नाही. रविंद्र चव्हाण यांचे वक्तव्य निंदनीय आहे. भाजपाची अशी संस्कृती लातूरकर स्वीकारणार नाहीत. याचे उत्तर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून भाजपाला मिळेल-प्रा. सुधीर अनवले.
बुद्धी गहाण ठेवल्याचे हे लक्षण
श्री विलासरावजी देशमुख हे लोकनेते आहेत. स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणा-या भाजपातील क्रुर आणि निर्दयी रविंद्र चव्हाणांनी श्री विलासरावजींबद्दल वक्तव्य करणे निषेधार्य आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुद्धी गहाण ठेवल्याचे हे लक्षण आहे. त्यांच्या
वक्तव्याचा जाहीर निषेध- नरसिंग घोडके.
चव्हाणांची नीच प्रवृत्ती लातूरकर खपवून घेणार नाहीत
रविंद्र चव्हाणांच्या नीच प्रवृत्तीला लातूरकर कधीच खपवून घेणार नाहीत. लातूरकर आणि विकासरत्न विलासराव देशमुख यांचे नोते अतूट आहे. चव्हाणांच्या वक्तव्याला लातूरकर १५ जानेवारी रोजी मतदानरुपी उत्तर देतील, असे रहिम शेख म्हणाले.
लातूरकरांच्या निष्ठेवर थेट हल्ला
भाजपने नीच राजकारणाची पातळी ओलांडलत आता थेट विलासरावजी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यातून संमस्त लातूरकरांचा अवमान झाला आहे. हा लातूरकरांच्या संस्कृतीवर आणि निष्ठेवर थेट हल्ला आहे. लातूरकर म्हणून या घमंडी भाजपला येणा-या निवडणुकीत नक्कीच जागा दाखवू- दगडूअप्पा मिटकरी.
रविंद्र चव्हाणांची नीच प्रवक्ती खपवून घेतली जाणार नाही
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण कुठल्या धमेंडीत आहे. ज्या विलासरावजी देशमुखसाहेबांची आठवण सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत राहणार आहे. त्यांच्याबद्दल चव्हाणांनी बोलने सत्तेचा माज चढ्याचे लक्षण आहे. त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध तर आहे. परंतू, अशा बुद्धी नसलेल्या व्यक्तीला पायातील काढून हानलं पाहिजे.- अॅड. अंगद गायाकवाड.

