39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रएकाच घरात आढळले ३ जणांचे मृतदेह

एकाच घरात आढळले ३ जणांचे मृतदेह

नागपूर : राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे, नागपूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान गावात घरात ३ मृतदेह आढळले आहे. एकाच परिवारातील पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

शांतीनगर तुमान गावात इळपुंगटी हे कुटुंबीय राहत होते. आज सकाळी बराच वेळ झाला घरातील सदस्य काही बाहेर येत नव्हते. त्यामुळे शेजा-यांनी घरात डोकावून पाहिले असता सर्वांना धक्का बसला. घरातील तिघांचे मृतदेह आढळून आले. पती श्रीनिवास इळपुंगटी (५८), पत्नी पद्मालता इळपुंगटी(५४) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (२९) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. श्रीनिवास यांचा मृतदेड बेडरुममध्ये आढळून आला आहे. तर पत्नी पद्मालता आणि मुलगा वेंकटचा मृतदेह दुस-या खोलीत आढळून आला आहे. मृतांचा राईस मिलचा कौटुंबिक व्यवसाय आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शव विच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली कुणी हत्या केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR