23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रअपघातातील गाडी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचीच

अपघातातील गाडी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचीच

नागपूर : प्रतिनिधी
नागपुरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने धावणा-या एका ऑडी कारने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघाताच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असताना आता या घटनेला राजकीय वळण लागले आहे.

अपघातातील ऑडी कार ही भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचीच असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, नागपूरच्या रामदास पेठ येथे घडलेल्या ‘हिट अँड रन’प्रकरणातील गाडीचा नंबर पोलिसांनी का नोंदवला नाही? माझा थेट आरोप आहे की, संकेत बावनकुळे हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा अपघातावेळी गाडीत होता.

तर ही गाडी प्रताप कामगार यांच्या मालकीची असून गाडीचे मालकही ते आहेत. मात्र, अपघाताच्या वेळी पोलिसांनी गाडी नंबर नोंद करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय का दिला? गाडी आणि संबंधित लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतले नाही? एका नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

अपघातातील गाडी माझ्या मुलाच्या नावावर :
चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, या प्रकरणावर आता स्वत: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी बावनकुळे म्हणाले की, या अपघातातील गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही वेगळा न्याय देता कामा नये. किंबहुना, जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तसेच याबद्दल मी कुठल्याही पोलिस अधिका-यांशी आतापर्यंत बोललेलोही नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR