27.7 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रनिर्मिती मूल्याच्या तब्बल ४५० टक्क्यांनी दारू महागली

निर्मिती मूल्याच्या तब्बल ४५० टक्क्यांनी दारू महागली

आजपासून नवे दर लागू राज्य उत्पादन शुल्क विभागाचे परिपत्रक जारी

मुंबई : भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर(आयएमएफएल) दारु निर्मितीच्या तब्बल ४५० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दरम्यान मंगळवार दि. २४ जून रोजी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने दारूचे नवे दर कसे असणार याचे परिपत्रक जारी केले असून नव्या दरांची अंमलबजावणी बुधवार दि. २५जूनपासून करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर(आयएमएफएल) स्पिरीट्स रुपये २६० प्रति बल्क लिटर पर्यंत मुल्य घोषीत केल्यास निर्मिती मुल्याच्या ४५० टक्के अथवा प्रति रुपये ७५० प्रुफ लिटर किंवा यापैकी जे जास्त असेल ती किंमत आकारण्यात येईल. यासाठी निर्मिती मुल्य गुणीला ६.५ अधिक विक्रीकर हे सुत्र वापरण्यात येणार आहे. तर भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर(आयएमएफएल) स्पिरीट्स रुपये २६० प्रति बल्क लिटर पेक्षा जास्त निर्मिती मुल्य घोषीत केल्यास निर्मिती मुल्याच्या ३०० टक्के आणि निर्मिती मुल्य गुणीले ५ अधिक निर्मिती मुल्य – २६० गुणीले ४ अधिक विक्रीकर असे सुधारीत मुल्य असणार आहेत.

आता मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटींचा महसूल वाढणार आहे. यासोबतच राज्य सरकारने आता सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता दिली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता यातून आणखी महसूल वाढणार आहे.

१८० मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत
देशी मद्य- ८० रुपये
महाराष्ट्र मेड लिकर – १४८ रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – २०५ रुपये
विदेशी मद्याचे प्रिमीयम ब्रॅण्ड – ३६० रुपये

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR