देशावर आता अर्णव चक्रीवादळाचे सावट

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णव’ चक्रीवादळ अधित तीव्र होत चालले आहे. त्यामुळे सरकारने पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला असून मंगळवारी ओडिशातील अनेक भागांमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पावसाने थौमान घातले आहे. ‘अर्णब’ हे अती तीव्र चक्रीवादळ पूर्वेकडील किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून पुढील २४ तासांत आंध्र प्रदेशच्या किना-यावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने गंजाम, गजपती, रायगडा, मलकानगिरी, कोरापुट आणि नबरंगपूर या सहा जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये १२ ते २० सेंटीमीटरपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या सहा जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच बालासोर, भद्रक, जाजपूर, कटक यांसारख्या १६ जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला असून तिथे ४ ते ११ सेंटीमीटर पाऊस पडू शकतो, असा अंजाद हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण किनारपट्टी रेल्वे विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून एकूण ५३ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आयएमडीच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ मागील सहा तासांत २२ किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकले आहे. मंगळवारी सकाळी साडे पाच वाजता हे वादळ विशाखापट्टणमपासून सुमारे २६० किलोमीटर आग्नेयेला बंगालच्या उपसागरावर पोहचले.

तर पुढे २७ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल आणि नंतर वायव्येकडे वळून २८ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला बापात्ला आणि विशाखापट्टणम (यानाम जवळ) धडकण्याची शक्यता आहे. या काळात वा-याचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटर वायुझोतांचा वेग १४० किलोमीटरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
या वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ओडिशाचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की, राज्य सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून संवेदनशील ठिकाणी कर्मचारी आणि उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.

लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर
सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, किनारपट्टीच्या धोकादायक भागात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news