16 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रलेकीचे लग्न टोलेजंग करणार

लेकीचे लग्न टोलेजंग करणार

ट्रोलिंग झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांचा निर्धार

अहिल्यानगर : लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण, गाड्यांचा ताफा, थाटमाट यावरून लोकांनी त्यांना सुनावलं. मात्र आता या सर्व टीकेला इंदुरीकर महाराज यांनी थेट उत्तर दिले असून त्यावर भाष्य करत टीकाकारांना सुनावले असून लेकीचे लग्न आतातर टोलेजंगच करणार असल्याचा निर्धार इंदुरीकर महाराज यांनी केला आहे.

नुकतेच त्यांचे कीर्तन पार पडले, त्यावेळी त्यांनी टीकाकारांना खडेबोल सुनावले. माझ्यापर्यंत ठीक होते, पण आता लोकं माझ्या मुलीलाही बोल लावत आहेत. तिच्या कपड्यांबद्दल कमेंट केली जात आहे, लोकांनी किती खालची पातळी गाठली आहे असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मात्र त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी टीकाकारांना, ट्रोल करणा-यांना थेट चॅलेंज दिले आहे. ‘मला माहीत होते या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत. त्यांना चॅलेंज सांगतो मी (मुलीचे) लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे, बघू कोणाचे काय म्हणणे आहे ते असा थेट इशारा इंदुरीकर महाराज यांनी दिला. ३० मिनिटांच्या सभेला ३ कोटी खर्च आहे, कोणत्याही चॅनेलवाल्यांना विचारून दाखवा, पैसे कुठून आणले? असेही ते म्हणाले. ही सगळी विकली गेलेली लोकं आहेत, दुस-याला किती त्रास द्याव यालाही मर्यादा आहेत हो, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत इंदुरीकर महाराज यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR