30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeमहाराष्ट्रभल्या पहाटे कामाचा उदय करणा-या नेत्याचा पहाटे अंत

भल्या पहाटे कामाचा उदय करणा-या नेत्याचा पहाटे अंत

राजकारणातही दबदबा

बारामती : महाराष्ट्रासाठी आजची सकाळ अतिशय धक्कादायक ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमाान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीतत लँडिंगदरम्यान अजित पवार यांचे विमान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयानक होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि हवेत धुराचे लोट पसरले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातला ताकदवान चेहरा
२२ जुलै १९५९ साली जन्मलेले अजित पवार यांचा राजकारणात मोठा दबदबा होता. १९८२ साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असे नाव होते ज्यांनी अनेक दशके सत्ता आणि संघटना दोन्हीवर मजबूत पकड राखली. अजित पवार यांनी १९८२ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात लवकरच स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांचे काका शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्ष आणि नंतर फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

७ वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
भल्या पहाटे उठून काम करणा-या नेत्यांमध्ये अजित पवार यांचे हमखास नाव घेतले जायचे. ७ वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे होता. प्रशासनावर असलेला त्यांचा वचक आणि राजकारणतला त्यांचा दबदबा सर्वश्रुत होता.

शरद पवार यांच्या सरकारमध्ये
मिळाली मोठी जबाबदारी
१९९३ साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अजित पवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतरही ते सरकार आणि संघटनेत महत्त्वाच्या भूमिका बजावत राहिले. २०१० मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युती सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांचा राजकीय लौकिक आणखी वाढला. या काळात ते राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले. राजकारणाव्यतिरिक्त, अजित पवार यांचा सहकार क्षेत्रातही मोठा प्रभाव होता. ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित होते आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

जुलै २०२३ पुन्हा सांभाळली
उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी
अजित पवार यांनी जुलै २०२३ पासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. या भूमिकेत त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आपले निर्णायक अस्तित्व प्रस्थापित केले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव असलेले अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक कुशल रणनीतीकार आणि मजबूत प्रशासक मानले जात होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR