खामेनींच्या अन्त्यविधीवेळी १४ महिन्यांच्या नातीची शवपेटी पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले

तेहरान : वृत्तसंस्था
इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अन्त्यसंस्कारासाठी तेहरानमध्ये हजारो नागरिक एकत्र आले आहेत. या अन्त्यसंस्कार सोहळ्यातील एक अत्यंत भावूक आणि धक्कादायक दृश्य समोर आले आहे. खामेनी यांच्या पार्थिवाशेजारीच त्यांच्या अवघ्या १४ महिन्यांच्या चिमुरड्या नातीची शवपेटी देखील ठेवण्यात आली. ती पाहून उपस्थितांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हेलावला.
२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होताच इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात खामेनी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य मृत्युमुखी पडले. यामध्ये त्यांच्या १४ महिन्यांच्या चिमुरड्या नातीचाही समावेश होता. अन्त्यसंस्कारावेळी खामेनी यांचे जावई, त्यांची मोठी मुलगी आणि इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजताबा खामेनी यांच्या पत्नीलाही आदरांजली वाहण्यात आली.

भारतातील इराण दूतावासाने वाहिली आदरांजली
यापूर्वी भारतातील इराण दूतावासानेही या चिमुरडीला श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी म्हटले होते, शहीद झहरा मोहम्मदी गोलपायेगानी. इस्लामिक क्रांतीचे शहीद नेते अयातुल्ला खामेनी यांची नात, जिला त्यांच्यासोबतच हौतात्म्य लाभले.

विविध देशांतील प्रतिनिधी अन्त्­यविधीत सहभागी
खामेनी यांची राष्ट्रीय ध्वजात गुंडाळलेली शवपेटी तेहरानच्या ‘ग्रँड मोसल्ला’ येथे ठेवण्यात आली. तिथे इराणचे वरिष्ठ नेते, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती आणि परदेशी पाहुण्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. या सोहळ्याला संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर कलिबाफ, परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि अध्यक्ष मसूद पेझेश्कियान प्रामुख्याने उपस्थित होते. इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये काळे कपडे परिधान केलेले हजारो नागरिक प्रार्थनेसाठी जमल्याचे दिसले. तेथील पारंपरिक प्रथेनुसार, अनेकांनी आपले स्कार्फ आणि इतर वैयक्तिक वस्तू शवपेटीला स्पर्श करण्यासाठी कर्मचा-यांच्या दिशेने फेकल्या. इराणमध्ये या प्रथेने आशीर्वाद मिळतात, अशी श्रद्धा आहे.

शवपेटीवर शिया पंथातील महत्त्­वाची घोषणा
नंतर या शवपेटीवर ‘या हुसेन’ लिहिलेला लाल रंगाचा ध्वज घालण्यात आला. ही शिया पंथातील एक महत्त्वाची घोषणा असून, ती प्रेषित मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ वापरली जाते. इराकच्या कर्बला येथील इमाम हुसेन यांच्या दर्ग्यातून हा ध्वज आणला होता. शिया परंपरेत हा लाल ध्वज अन्यायकारकपणे मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या रक्ताचे आणि ‘सूडाचे’ प्रतीक मानला जातो.

अन्त्ययात्रा अनेक शहरांत जाणार
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खामेनी यांचा अन्त्यविधी पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. त्यांचे पार्थिव इराण आणि शेजारील इराकमधील विविध शहरांमध्ये नेले जाईल. या पार्श्वभूमीवर तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते बंद करण्यात आले असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर इराणचे नवे सर्वोच्च नेते बनलेले अयातुल्ला मोजताबा खामेनी हे सुरक्षेच्या कारणास्तव या अन्त्यसंस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52

Latest news