23.1 C
Latur
Tuesday, July 8, 2025
Homeमहाराष्ट्रदेशात राजकीय नव्हे तर विचारधारेचा लढा सुरू : राहुल गांधी

देशात राजकीय नव्हे तर विचारधारेचा लढा सुरू : राहुल गांधी

नागपूर : नागपूरमध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस गुरुवारी साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पक्षाच्या मेगा मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी भारतातील लोकांना आणि स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. अस्पृश्यता होती, ही आरएसएसची विचारधारा आहे. आम्ही ती विचारधारा बदलली. परंतु, आता त्यांना ती परत आणायची आहे. भारत स्वातंत्र्यापूर्वी जिथे होता तिथे परत आणायचे आहे. देशात राजकीय नव्हे तर विचारधारेचा लढा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे तरुणांवर हल्ले होत आहेत आणि दुसरीकडे देशाची संपूर्ण संपत्ती भारतातील २-३ अब्जाधीशांना दिली जात आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी दीड लाख तरुणांची निवड करण्यात आली होती. मोदी सरकारने अग्निवीर योजना लागू केली आणि या तरुणांना लष्कर आणि हवाई दलात भरती होऊ दिले नाही. लोक म्हणतात काँग्रेस ने काय केले? स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये ५०० ते ६०० राजे होते. इंग्रज होते. देशातील लोकांना कुठलाच अधिकार नव्हता, गरीब व्यक्तीची जमीन आवडली तर राजा घेत होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला अधिकार दिले, या देशामध्ये लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली.

देशात विचारधारेचा लढा सुरू आहे, लोकांना वाटते की हा राजकीय लढा आहे, जो योग्य आहे पण या लढ्याचा पाया विचारधारा आहे. अनेक पक्ष एनडीए आणि इंडिया आघाडीत आहेत पण लढा दोन विचारधारा दरम्यान आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक संविधानविरोधी आहेत. ते तिरंग्याला सलामी देत नव्हते, मात्र आपल्याला सर्व अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळाले आहेत. सर्वांना एक मत देण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR