नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून ९६ जागांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या विजयासाठी चौथ्या टप्पा महत्त्वाचा आहे, असा दावा खरगे यांनी केले आहे. देशातील वातावरण पूर्णपणे न्यायाच्या बाजूने आहे, काहीजन समाजात फूट पाडणारी आणि व्देषयुक्त भाषणे करून लोकांचे लक्ष विचलित करत आहेत, त्याला घाबरू नका इंडिया आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे खरगे म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी सोशल मीडियावरून देशातील मतदारांना संबोधित करताना म्हटले की, मी तुम्हाला आवाहन करतो की, लोकशाहीचे रक्षण करण्याच्या आमच्या सामूहिक उद्दिष्टावर आणि आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या भारतीय संविधानावर लक्ष केंद्रित करा.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यात तुम्ही लोकशाहीला मतदान करून राज्यघटना निरंकुश शक्तींपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. आज १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या ९६ जागांवर मतदान होत आहे. यामुळे संपूर्णपणे न्यायाच्या बाजूने उभा राहुन इंडिया आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे खरगे म्हणाले.