महाकाय जहाज भरकटले

ग्रेट निकोबार : अंदमान आणि निकोबार कमांडने दाखवलेली सतर्कता आणि तत्परतेमुळे हिंद महासागरात एक मोठी सागरी दुर्घटना टळली आहे. इंजिन निकामी झाल्यामुळे समुद्रात नियंत्रण सुटून वाहवत चाललेल्या ‘एमव्ही पायरा’ या जहाजाची भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने अत्यंत कौशल्याने सुरक्षित सुटका केली. या विशेष सुटका मोहिमेला ऑपरेशन लान्सर असे नाव देण्यात आले होते. अंदमान आणि निकोबार कमांडने याबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती दिल्याचे वृत्त आहे.

एमव्ही पायरा या जहाजाचे मुख्य इंजिन (प्रॉपल्शन) अचानक बंद पडल्यामुळे जहाजावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. हे जहाज समुद्राच्या लाटांवर अनियंत्रितपणे वाहवत ग्रेट निकोबार बेटाच्या किना-याकडे सरकत होते. जर हे जहाज किना-याला जाऊन धडकले असते तर जहाजावरील इंधनामुळे समुद्रात मोठे तेल सांडून अथांग सागरी जीवसृष्टी नष्ट होण्याचा आणि मोठी पर्यावरणीय आपत्ती ओढवण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. जहाजावरून मदतीचा आपत्कालीन संदेश मिळताच अंदमान आणि निकोबार कमांड त्वरित अ‍ॅक्शन मोडमध्ये आली. संदेश मिळताच भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाची युद्धनौका, तीन शक्तिशाली टग्स तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या. पथकाने अत्यंत खडतर परिस्थितीत जहाजाला ग्रेट निकोबार बेटाजवळील भारताच्या सागरी हद्दीत सुरक्षितपणे नांगरले. या जहाजाची वाहवत जाण्याची क्रिया थांबली.

भारतीय सैन्याची सतर्कता
जहाजाला सुरक्षित केल्यानंतर नौदलाच्या एका विशेष तांत्रिक पथकाने जहाजावर जाऊन इंजिन दुरुस्तीसाठी तांत्रिक मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम भारतीय सैन्याची सततची सतर्कता, मोहीम-सज्जता आणि सागरी सुरक्षेप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करते. वेळेत केलेल्या या कारवाईमुळे समुद्रातील मानवी जीविताचे रक्षण तर झालेच, शिवाय एक संभाव्य पर्यावरणीय आपत्तीही पूर्णपणे टळली आहे असे अंदमान आणि निकोबार कमांडने सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news