22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रसरकार संवेदनाहिन

सरकार संवेदनाहिन

रोहित पवार यांचा आरोप

पुणे : प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू आपल्या समर्थकांसह आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यात बच्चू कडू आणि आंदोलकांची प्रकृती बिघडली असून या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सरकारला आंदोलकांचा बळी घ्यायचा आहे का? सरकारच्या संवेदना गेल्या कुठे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलकांची तब्येत बिघडलेली असताना आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांकडे असलेली ईसीजी मशीन देखील बंद असणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की बच्चूभाऊ कडू यांच्यासह पन्नास आंदोलकांचा अन्नत्याग आंदोलनाचा आज ६ वा दिवस असताना हे सरकार मात्र डोळे झाकून आणि कानावर हात ठेवून बसले आहे. आज काही आंदोलकांची तब्येत बिघडली असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी उपस्थित आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांकडील साधे ईसीजी मशीनही बंद असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. या सरकारला आंदोलकांचा बळी घ्यायचाय का? सरकारच्या संवेदना गेल्या कुठं?’

बच्चू कडूचे उपोषण हे प्रसिद्धीसाठी आहे. बच्चू कडूंना विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य असेल, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती. त्यावर राजू शेट्टी यांनी एका पोस्टच्या माध्यमातूमन विखे पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, विखे पाटील साहेबांनी बोललेले वाक्य म्हणजे शेतकरी आंदोलनास गालबोट लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातील शब्द आहेत. बच्चू कडू यांचे उपोषण जर प्रसिध्दीसाठी असेल तर सुजय विखे -पाटील यांचाही लोकसभेत पराभव झाला आहे. उद्यापासून सुजय विखे यांना संपुर्ण कर्जमुक्तीसाठी आमरण उपोषणास बसवावे महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्या सोबत येईल, असेही शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR