मुंबई : धर्म आणि जात पुन्हा दिसू लागला आहे. सत्ताधारी पक्ष स्वत: विरोधातच आंदोलन करताना दिसत आहे. तुमचीच सत्ता आहे. दाखवण्यासाठी तुम्ही विरोधकांविरोधात आंदोलन करत आहात. सांगली येथे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझे सरळ मत असे आहे की, तो पुतळा पाडला की पडला, याचीही चौकशी झाली पाहिजे. आम्ही आतापर्यंत अनेक पुतळ्यांची उद्घाटने केली आहेत. पण ते कधी पडले नाहीत. हा धातूचा पुतळा असून कसा पडला, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. जातिजनगणनाबाबत प्रश्न विचारला असता, निवडणुकीच्या तोंडावर ते विधान केले आहे. पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सरकारने खोटे बोलू नये. तुम्ही पंतप्रधान आहात. पंतप्रधानांना आणि त्यांच्या कॅबिनेटला अशी बातमी देणे शोभत नाही. जातिजनगणना करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे तुम्ही बोलतात ते मान्य करायचे की, न्यायालयात सांगितले ते मान्य करायचे, अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ओबीसींसाठी दौरे करीत आहे. सर्व पक्ष ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत. ओबीसी आणि मराठामध्ये हा रोष पसरत चालला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. वर्गीकरण बरोबरच क्रिमिलियर ही अट घालण्यात आली. जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला. लोकसभा पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकार या परिस्थितीला कंट्रोल करण्यात फेल झाले आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या बाबतीत आरएसएस आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. हिंसेची भाषा करणे म्हणजे समाजात तेढ निर्माण होत आहे. नितीन गडकरी यांच्या खात्यातील रिपार्ट आला आहे. त्याची चर्चा कुठे नाही. मनमोहनसिंग यांच्या काळातील चर्चा होते. गडकरी हे विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्याची चर्चा होत नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.