26.2 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeराष्ट्रीयघुसखोरीचा प्रयत्न फसला

घुसखोरीचा प्रयत्न फसला

लष्कराचा गोळीबार, अतिरिक्त फौजफाटा तैनात

श्रीनगर : वृत्तसंस्था
लष्कराने ४-५ ऑगस्टच्या रात्री जम्मू-काश्मीरच्या अखनूर आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दुस-या बाजूने गोळीबार झाला नसला तरी संशयित सीमा ओलांडत असताना लष्कराने गोळीबार केला.

अखनूरच्या बट्टल सेक्टरमध्ये ३ ते ४ घुसखोरांच्या संशयास्पद हालचालींनंतर सकाळी लष्कराने गोळीबार केला. परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ड्रोनच्या साह्याने परिसरावर नजर ठेवली जात आहे. तत्पूर्वी, राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी-नौशेरा सेक्टरमध्ये सकाळी संशयास्पद हालचाली दिसल्या होत्या. पुलवामाच्या अवंतीपोरा येथील पंजगाम परिसरात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, २ मॅगझिन आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

सुरक्षेमुळे अमरनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ हटवून आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. येणा-या-जाणा-या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनावर नजर ठेवण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR