21.6 C
Latur
Thursday, October 10, 2024
Homeराष्ट्रीयआमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबली

आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबली

ठाकरे गटाच्या याचिकेवर आता २१ ऑक्टोबरला सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टात १७ सप्टेंबरऐवजी आता २१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले नसले तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. यापूर्वी सुनावणी दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. ही सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार होती. पण आता ही सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR