विरोधकांना रविवारी संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावी

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या २८८ आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून सुरु झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथविधीवरच बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येताना दिसले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या कृतीची खिल्ली उडवत हा रडीचा डाव असल्याचे म्हटले. ते शनिवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मी महाविकास आघाडीत काम केले आहे, मी त्यांचा कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम मशिनला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना ३१ जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगले होते. पण विधानसभेला पराभव होताच त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीत प्रत्येकाला काय बोलायचे हा अधिकार आहे. पण विरोधकांना शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल. ती एक प्रोसिजर आहे. तरच त्यांना परवा सभागृहातील कामकाजात सहभागी होता येईल असे अजित पवार यांनी म्हटले.

विरोधकांनी पहिल्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय, असे दाखवायचे आहे. आम्ही संख्येने कमी असलो तरी अस्तित्व दाखवण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे. या सगळ्याला अर्थ नाही. सुरुवातीला विरोधाक आत बसले होते. आठ-दहा लोकांची शपथ झाल्यावर ते सभागृहातून बाहेर जायला निघाले. त्यावेळी मी त्यांना विचारले, कुठे चाललात? त्यावर विरोधक म्हणाले, असेच बाहेर जात आहोत. मी बाहेर आल्यावर कळालं की विरोधकांनी आज शपथ घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे असे अजित पवार यांनी सांगितले.
आयकर विभागाने १००० कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवली, विरोधकांच्या आरोपावर अजित पवार हसून म्हणाले.

राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न
अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांची १००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार हसले. त्यांनी म्हटले की, मी इतकी वर्षे त्यांच्यासोबत होतो. मी भ्रष्टाचारी आणि दोषी असतो तर मविआने माझ्यासोबत काम केले नसते. कोर्टाचा निकाल एका दिवसात येत नाही. यासंदर्भात प्रोसेस सुरु होती. मला जिथे न्याय मिळेल असे वाटत होते, तिकडे मी गेलो आणि न्याय मागितला. विरोधकांसाठी मी त्यांच्यासोबत असला की चांगला असतो. राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे असे अजित पवार यांनी म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news