21.6 C
Latur
Thursday, October 10, 2024
Homeमनोरंजनइटलीत होणार ‘वॉर २’ चे शूटिंग

इटलीत होणार ‘वॉर २’ चे शूटिंग

मुंबई : सध्या हृतिक रोशन त्याच्या आगामी अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट ‘वॉर २’ मुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच हृतिकसोबत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे, त्यानुसार ‘वॉर २’ मध्ये कियारा आणि हृतिकचा रोमँटिक ट्रॅक असू शकतो, ज्याचे शूटिंग इटलीमध्ये होणार आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जी ‘वॉर २’ ची टीम इटलीला घेऊन जाण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, १८ सप्टेंबर २०२४ पासून टीम इटलीमध्ये हृतिक आणि कियारा अडवाणीवर प्रीतमने रचलेल्या रोमँटिक गाण्याचे शूटिंग सुरू करेल. ‘वॉर २’ च्या गाण्याचे शूटिंग इटलीमध्ये जवळपास १५ दिवस चालणार आहे.

अयानने तिथे रोमँटिक गाणे चित्रित करण्याची पूर्ण योजना आखली आहे. या गाण्यात हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत ग्लॅमरस अवतारात दिसणार आहेत. ‘वॉर २’ हा आदित्य चोप्राच्या स्पाई युनिवर्सचा सहावा भाग आहे, याआधी ‘एक था टायगर’ (२०१२), ‘टायगर जिंदा है’ (२०१७), ‘वॉर’ (२०१९), ‘पठाण’ (२०२३) आणि ‘टायगर ३’ (२०२३) आले. या चित्रपटाद्वारे ज्युनियर एनटीआर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण देखील करत आहे. यामुळे हृतिक आणि ज्युनियर एनटीआरचे चाहते ‘वॉर २’ ची आतुरतेने वाट पहात आहेत.

प्रीतमने संगीतबद्ध केले एक खास गाणे
दरम्यान, कियारा आणि हृतिकवर चित्रित करण्यात येणारे रोमँटिक गाणे प्रीतमने संगीतबध्द केले आहे. हे गाणे मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहे आणि व्हेनिस, टस्कनी, लेक कोमो, नेपल्स, अमाल्फी कोस्ट आणि सोरेंटोसह अनेक सुंदर लोकेशन्सवर शूट केले जाणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या नंतर ‘वॉर २’ची टीम ऑक्टोबरच्या सुरुवातीला भारतात परतणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR