Homeमनोरंजन‘राजा शिवाजी’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड

अवघ्या ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला

मुंबई : अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘राजा शिवाजी ’ हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. रितेश यांनी अभिनयासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.

हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये अक्षरश: गर्दी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची चर्चा आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक मोठी ‘ओपनिंग’ मिळवून ‘राजा शिवाजी’ने एक नवा मापदंड तयार केला आहे.

आता सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४.२५ कोटींचा व्यवसाय करत या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. तर आतापर्यंत राजा शिवाजी सिनेमाची एकूण कमाई ५० कोटी इतकी झाली आहे. यावरून ‘राजा शिवाजी’ हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला आहे. ‘सैराट’, बाई पण भारी देवा तसेच वेड या चित्रपटांच्या यादीत राजा शिवाजी सिनेमाने आपले स्थान पक्के केले आहे. रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांच्या भूमिका आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR