परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांची अधिकृत घोषणा केली आहे. यानुसार, राज्यातील क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी ५३ खेळांच्या विविध वयोगटांतील स्पर्धांची आयोजन स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन व आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या वर्षीच्या नियोजनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या खेळांचे यजमानपद देण्यात आले आहे.
प्रमुख सांघिक, वैयक्तीक आणि मैदानी खेळात अॅथलेटिक्स १४ वर्षांखालील स्पर्धा रत्नागिरी, १७ वर्षांखालील पालघर, तर १९ वर्षांखालील स्पर्धा जळगाव येथे आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉल मुलींच्या सर्व गटांचे (१४, १७, १९ वर्षे) सामने अकोल्यात, तर मुलांचे सामने कोल्हापुरात होतील. क्रिकेट : १४ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुले-मुलींचे सामने जळगाव येथे, तर १९ वर्षांखालील स्पर्धा रत्नागिरीत खेळवले जातील. कबड्डी मुलांचे गट अनुक्रमे ठाणे (१४ वर्षे), वाशिम (१७ वर्षे) आणि पुणे (१९ वर्षे) येथे होतील. मुलींचे सामने मुंबई शहर (१४ वर्षे), रायगड (१७ वर्षे) आणि कोल्हापूर (१९ वर्षे) येथे आयोजित केले आहेत.
खो-खो – मुलांच्या स्पर्धा धाराशिव (१४ वर्षे), जालना (१७ वर्षे) आणि छत्रपती संभाजीनगर (११ वर्षे) येथे, तर मुलींच्या स्पर्धा अहिल्यानगर (१४ वर्षे) रत्नागिरी (१७ वर्षे) आणि सातारा (११ वर्षे) येथे होतील. बास्केटबॉल – १४ व १७ वर्षांखालील स्पर्धा यवतमाळमध्ये, तर १९ वर्षांखालील स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडेल. हॉकी – १४ व १७ वर्षांखालील सामने बुलढाण्यात, तर १९ वर्षांखालील सामने कोल्हापुरात होतील. व्हॉलीबॉल – १४ वर्षांखालील रत्नागिरी, १७वर्षांखालील कोल्हापूर आणि १९ वर्षांखालील स्पर्धा जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. हॅन्डबॉल – १४ वर्षांखालील कोल्हापूर, १७वर्षांखालील वाशिम आणि १९ वर्षांखालील स्पर्धा सांगलीत होईल.
कुस्ती – १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धा सोलापुरात होतील, तर १४ व १९ वर्षांखालील मुलांचे सामने अहिल्यानगरमध्ये आणि मुलींचे सामने रायगड येथे रंगतील. तलवारबाजी – १४ वर्षांखालील स्पर्धा जालन्यात, तर १७ व १९ वर्षांखालील मुले-मुलींचे सामने सोलापूर येथे होतील. बॉक्सिंग – १४ व १९ वर्षांखालील अकोला, तर १७वषार्खालील स्पर्धा परभणीत होईल. ज्यूदो – १४ वर्षांखालील वाशिम, तर १७ व १९ वर्षांखालील सामने अकोल्यात होतील. कराटे व किकबॉक्सिंग – या दोन्ही खेळांचे यजमानपद वर्धा जिल्ह्याला मिळाले आहे.
तायक्वांदो अकोला येथे तर वुशू स्पर्धा नंदुरबार येथे आयोजित केली जाईल. थायबॉक्सिंग – १७ व १९ वर्षांखालील सामने नागपुरात होतील. लॉन टेनिस – १४ वर्षांखालील वाशिम, १७वर्षांखालील पुणे आणि १९ वर्षांखालील स्पर्धा सोलापूर येथे पार पडेल. सॉफ्ट टेनिसचे सामने नाशिक (१४ वर्षे), सातारा (१७ वर्षे) आणि पुणे (१९ वर्षे) येथे होतील. टेबल टेनिस १४ वर्षांखालील वर्धा, १७ वर्षांखालील परभणी आणि १९ वर्षांखालील स्पर्धा नांदेडमध्ये होईल. बॅडमिंटन – या खेळाचे सामने बुलढाणा येथे खेळवले जातील. स्क्वॉश मुलांचे सर्व गट वाशिममध्ये आणि मुलींचे सर्व गट पुण्यात सामने रंगतील. नेमबाजी (शूटिंग) नागपूर येथे अचूक वेध घेतला जाईल.
जलतरण, डायव्हिंग आणि वॉटरपोलो – जलतरण व डायव्हिंगचे सर्व गट आणि वॉटरपोलो (१९ वर्षांखालील मुले) या जलक्रीडा स्पर्धांचे आयोजन सोलापूर जिल्ह्यात केले जाईल. सायकलिंग रोड रेस – भंडारा येथे होईल, तर ट्रॅक सायकलिंगची थेट निवड चाचणी पुणे येथे घेतली जाईल. रोलर स्केटिंग व रोलर हॉकी – सर्व गटांच्या स्केटिंग स्पर्धा आणि १९ वर्षांखालील मुलांची रोलर हॉकी पालघर येथे होईल. जिमनॅस्टीक – नागपूर येथे तर मल्लखांब स्पर्धा ठाणे येथे आयोजित केली जाईल. योगासन- सांगली जिल्ह्याला या स्पधेर्चे यजमानपद मिळाले आहे. धनुर्विद्या (आर्चरी) – १४ वर्षांखालील परभणी, १७ वर्षांखालील अमरावती आणि १९ वर्षांखालील स्पर्धा सोलापुरात होईल. बुद्धिबळ – नांदेड येथे बुद्धिबळाचा पट मांडला जाईल. कॅरम – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामने रंगतील. बॉल बॅडमिंटन – अकोला येथे, तर बेसबॉल स्पर्धा गडचिरोली (१४ वर्षे), जळगाव (१७ वर्षे) आणि सातारा (१९ वर्षे) येथे विभागली आहे. डॉजबॉल – १७ व १९ वर्षांखालील स्पर्धा बुलढाणा येथे होईल. नेटबॉल – १४ वर्षांखालील चंद्रपूर, १७ वर्षांखालील यवतमाळ आणि १९ वर्षांखालील नाशिक येथे होईल. रोलबॉल – १७ व १९ वर्षांखालील सामने यवतमाळ येथे खेळवले जातील. शूटिंगबॉल – १७ वर्षांखालील बुलढाणा आणि १९ वर्षांखालील यवतमाळ येथे होईल.
सॉफ्टबॉल – १४ वर्षांखालील गडचिरोली, १७वर्षांखालील धुळे आणि १९ वर्षांखालील जळगाव येथे होईल. रग्बी – १४ वर्षांखालील सांगली, तर १७ व १९ वर्षांखालील स्पर्धा रत्नागिरीत होईल. सेपक टकरा – मुलांचे सामने वर्धा येथे आणि मुलींचे सामने परभणी येथे होतील. मॉडर्न पेंटॅथलॉन – १७ व १९ वर्षांखालील सामने साता-यात रंगतील. आट्यापाट्या – मुलांचे सामने जळगाव आणि मुलींचे सामने वाशिम येथे होतील. टेनिक्वॉईट – नंदुरबार येथे, आष्टे डू आखाडा भंडारा येथे, स्पीडबॉल सातारा येथे, मिनीगोल्फ नागपूर येथे आणि तेंग सू डो स्पर्धा बुलढाणा येथे खेळवली जातिल. नेहरूहॉकी व सुब्रतो फुटबॉल स्पर्धाच्या १५ व १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या सामन्यांचे यजमानपद पुणे जिल्ह्याला देण्यात आले आहे. या राज्यस्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन त्या-त्या जिल्हयातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.
















