संसदेचे हिवाळी अधिवेशन पंधरा दिवसांचे

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या एक ते १९ डिसेंबरपर्यंत होणार आहे. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी ही घोषणा केली. एकूण १९ दिवसांतील आठवडी सुट्यांचे चार दिवस वगळता या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ १५ दिवस राहणार आहेत.

सन २०१३ नंतर (१४ दिवस) इतक्या कमी कालावधीचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असेल. ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक ते १९ डिसेंबरपर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. लोकशाहीला बळकटी देणा-या आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणा-या रचनात्मक आणि उत्पादक अधिवेशनाची सरकारला अपेक्षा आहे असे मंत्री रिजिजू यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. याआधी २१ जुलै ते २१ ऑगस्टपर्यंत चाललेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या गोंधळामुळे एकही पूर्ण दिवस नेहमीचे कामकाज चालू शकले नव्हते. त्यावेळीही ‘एसआयआर’चा मुद्दा होताच. त्यासह ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्यांवरून रोजच घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू होता. चर्चेसाठी ठेवलेल्या १२० तासांपैकी लोकसभेत फक्त ३७ तास चर्चा झाली होती. राज्यसभेतही जेमतेम ३८.८८ टक्के काम झाले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चाही कामकाजात धरण्यात आली होती. राज्यसभेचे तत्कालीन जगदीप धनखड यांनी त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला होता.

मतचोरी, एसआयआरवरून वादंगाची शक्यता
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढील शनिवारी (१४ नोव्हेंबर) जाहीर होणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सरकारवर मतचोरीचे आरोप कायम असल्याने बिहार निकालांचेही पडसाद आगामी अधिवेशनात उमटतील. बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रिया सध्या सुरू आहे. विरोधक याविरोधात कामकाज पुन्हा ठप्प करू शकतात. सरकारच्या बाजूने सार्वजनिक विश्वास विधेयक आणि दिवाळखोरी विधेयकासह किमान २०-२२ विधेयके मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जाते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news