मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी नाशिक धर्मांतर प्रकरणी निदा खान या मुख्य आरोपीला अटक केली आहे. ही मार्चमध्ये घटना घडली होती. दीड दोन महिने ती कुठे होती? कुणाला माहीत नाही. निदा खान ही एकटी नाही, तर तिची आई, मावशी देखील यात सहभागी होती. एमआयएम पक्षाने तिला सहकार्य केले आहे.
याआधी इम्तियाज जलील यांनी या संदर्भात वक्तव्य करत एकाअर्थी पाठिंबाच दिला होता. इतरही ठिकाणी एमआयएम त्यांच्या अशाच हालचाली वाढवत आहेत. हे सगळे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात होतात. निदा खान एक मोहरा असल्याचे सांगत सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर
धर्मांतर प्रकरणी भाष्य केले आहे.
पोलिसांच्या कारवाईसंदर्भात प्रश्नचिन्ह
राज्यभरात महिलांवर होणा-या अत्याचारांच्या घटनांबाबत बोलतानाही संजय सिरसाट यांनी पोलिसांच्या कारवाईसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात पोलिसांमध्ये आक्रमकपणा नाही. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करावी. पोलिसांचा धाक हा गुंडांवर असावा, असेही ते म्हणाले. राज्यात हिंदूचा द्वेष करण्याचे प्रकार सुरू आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगरसह सगळीकडे असे प्रकार पाहायला मिळतील. मी मुख्यमंत्र्यांना भेटून एसआयटी चौकशीची मागणी करणार आहे.
मोठे षडयंत्र
टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध लागला पाहिजे. २२-३०च्या दरम्यानच्या तरुणांना अस प्रशिक्षण देणे, नोकरी नाही तरी त्यांच्याकडे पैसा आहे. बाईक आहेत, पैसा येतो कुठून? बलात्कार, नशेखोरीचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. या प्रकरणी इम्तियाज जलील यांची देखील चौकशी झाली पाहिजे. हे एक मोठ षडयंत्र आहे असेही संजय शिरसाट म्हणाले.
















