28.5 C
Latur
Wednesday, October 9, 2024
Homeमहाराष्ट्रराजकीय फटाके फुटायला अजून वेळ

राजकीय फटाके फुटायला अजून वेळ

आमदार अपात्रतेप्रकरणी राहुल नार्वेकरांचे सूचक वक्तव्य

मुंबई : मुंबईच्या कुलाबा कोळीवाडा येथे दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. नार्वेकरांनी स्थानिक नागरिकांबरोबर दिवाळी साजरी केली, तसेच राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छादेखील दिल्या. दरम्यान, त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

नार्वेकरांनी या संवादादरम्यान, दिवाळीच्या फटाक्यांसह राजकीय फटाक्यांवर भाष्य केले. विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले, राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात, परंतु, आज आपण केवळ दिवाळीच्या फटाक्यांबद्दल बोलणं उचित राहील. कारण राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नार्वेकर यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ३१ डिसेंबरच्या राजकीय फटक्यांबाबत प्रश्न विचारला. त्यावर नार्वेकर म्हणाले, तुम्ही त्याची काळजी करू नका, राजकीय फटाके फुटण्यास थोडा वेळ बाकी आहे. जनसामान्यांना अपेक्षित निर्णय होणं गरजेचं आहे. लोकशाहीत असे निर्णय होत असताना ते संवैधानिक चौकटीत व्हायला पाहिजेत.

आमदार अपात्रतेच्या निर्णयाबाबत राहुल नार्वेकर म्हणाले, असे निर्णय शाश्वत ठरायला हवेत. हे निर्णय टिकून कसे राहतील, याचा विचार करणे अपेक्षित आहे. आपलं सरकार संवेदनशील आहे, विधिमंडळही संवेदनशील आहे. त्यामुळे येत्या काळात आपण एक शाश्वत आणि टिकाऊ निर्णय घेऊ. त्याला विधिमंडळाची साथ मिळेल. राजकीयदृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कायद्यात असणा-या तरतुदी, संविधानातील तरतुदींचे पालन केले जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR