23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरयावर्षी जरांगेंचा दसरा मेळावा

यावर्षी जरांगेंचा दसरा मेळावा

बीड : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे. आठवडाभर उपोषण करुनही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढची लढाई ही निवडणुकीची असेल, असे स्पष्ट संकेत जरांगे यांनी दिले आहे.

दुसरीकडे यावर्षी मनोज जरांगे दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती येत आहे. रविवारी त्यासंदर्भात एक बैठक होणार आहे. बीडमध्ये असलेल्या नारायणगडाचे विश्वस्त आणि मराठा समाजातील समन्वयकांची एक बैठक संपन्न होणार आहे. त्या बैठकीनंतर दसरा मेळावा जाहीर होईल. श्रीक्षेत्र नारायणगड येथे रविवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे. बीडमध्ये एकीकडे पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दरवर्षी दसरा मेळावा होतो, त्यात आता मनोज जरांगे यांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होऊ शकतो. बीड जिल्ह्यात गड आणि गडांभोवती फिरणारे राजकारण, याचे एक वेगळे सामाजिक, अध्यात्मिक आणि राजकीय सूत्र तयार झाले आहे. त्यामुळे गडावरच्या मेळाव्यांकडे सर्वांचच लागून असते.

मागच्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी रान उठवलेले आहे. त्यांच्या रेट्यामुळे सरकारने ‘सगेसोयरे’ अधिसूचना प्रसिद्ध केली. मात्र त्याचे अद्याप कायद्यात रुपांतर झाले नाही. ओबीसी समाज नाराज होऊ नये म्हणून सरकारने त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. सगेसोय-याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील जवळपास सर्वच मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू शकेल. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंबंधी सातत्याने मागणी केली आहे. हैदराबाद गॅझेट लागू केल्यास मराठवाड्यातील लाखो मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून येणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या येणारी अडचण सुटणार आहे. मात्र सरकारने अद्यापही हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR