मुंबई : येथील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चौघांच्याही शरीरात सापडले उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत. चौघांच्या शरीरात तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील सापडले झिंक फॉस्फाईट सापडले आहे.
२६ तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्ले होते. कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. २६ तारखेला अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला होता.
चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट आढळले
मुंबईतील पायधुणीतील चार जणांच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. कलिंगड तपासणी केल्यानंतर त्यात भेसळ आढळली नव्हती. त्या चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट आढळलं आहे. याचा वापर उंदीर मारण्यासाठी केला जातो. झिंक फॉस्फाईट त्या चौघांच्या शरिरात गेल्याने त्यांना उलट्या झाल्या, या नंतर ते फॅमिली डॉक्टरकडे गेले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. उलट्या झाल्याने विष बाहेर आल्याने चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट होते. उंदीर मारण्याच्या औषधाने त्यांचा मृत्यू झाला आहे. कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट कसे गेले याचा शोध घेतला जात आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारले? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

