रामाच्या नावाने चोरी करणा-यांनी देशाची माफी मागावी

नवी दिल्ली : राम मंदिर देणगी घोटाळा आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जवर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अधिवेशनाच्या तिस-या आठवड्यातही याचे पडसाद उमटत असून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला.

प्रभू श्रीरामाच्या नावाने चोरी करणा-यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी आणि देशाची दिशाभूल करणे थांबवावे अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत केली. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्यसभा दणाणून सोडली. यामुळे राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूबही करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये मौल्यवान भेटवस्तू, रोख दान, जमीन खरेदी आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. हा कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. या ट्रस्टची स्थापना केंद्र सरकारने केली असून त्याची घोषणा खुद्द पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केली होती. केंद्र सरकारने ७० एकराहून अधिक जमीन या ट्रस्टकडे सोपवली आहे आणि पंतप्रधान मोदी भूमिपूजनापासून ते प्राणप्रतिष्ठेपर्यंतच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात सहभागी राहिले आहेत असे खरगे राज्यसभेत म्हणाले.

शाह, मोदी पळ काढतायेत
दानातील चोरीसह इतर गंभीर आरोपांबाबत पंतप्रधान स्वत:च्या उत्तरदायित्वापासून पळ काढू शकत नाहीत. ईडी, सीबीआय, आयकर विभागासह इतर तपास यंत्रणा नेमक्या कुठे आहेत, याचे स्पष्टीकरण त्यांनी संसदेत दिले पाहिजे. प्रभू रामाच्या नावावर लूट करणा-यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि देशवासीयांची दिशाभूल करण्याचे काम त्वरित बंद झाले पाहिजे, अशी मागणीही खरगे यांनी केली.

विरोधकही खवळले
संसदेबाहेरही विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर देणगी चोरीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. अमित शाह सदन में आओ, सदन में आकर जवाब दो, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news