Homeमहाराष्ट्रमुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे...त्यांचेही नाव ‘राम’!

मुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे…त्यांचेही नाव ‘राम’!

आव्हाडांचा भाजप नेत्यावर हल्लाबोल

शिर्डी : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु राम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते राम कदम यावरुन आक्रमक झाले होते, त्यांना आज पत्रकार परिषदेत आव्हाडांनी सणसणीत टोला लगावला आहे.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु राम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते राम कदम यावरुन आक्रमक झालेत. ते घाटकोपोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय. त्यांनी समस्त राम भक्तांची माफी मागावी. दरम्यान, आज जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजप नेते राम कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड म्हणाले, मी जे वक्तव्य केलं त्यावरून जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबाबत खेद व्यक्त करतो. यामुळे खूप लोकांचं मन दुखावलं आहे, मुलींना उचलून घेऊन जाणारी भाषा करणारे देखील मी केलेल्या वक्तव्यानंतर माझ्यावर तुटुन पडले आहे. त्यांचंही नाव राम च आहे. मी त्यासाठी खेद व्यक्त करतो, असा टोला त्यांनी भाजप नेते राम कदम यांना लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR