25.7 C
Latur
Saturday, June 14, 2025
Homeक्रीडातीन प्रशिक्षकांची हकालपट्टी

तीन प्रशिक्षकांची हकालपट्टी

पाकिस्तान क्रिकेट संघात मोठे बदल

नवी दिल्ली : वर्ल्ड कप २०२३ च्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक मोठे बदल झाले आहेत. कर्णधारापासून प्रशिक्षकापर्यंत बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता पाकिस्तानचा संघ न्यूझिलंड दौ-यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना १२ जानेवारीला होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपले परदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिका-याने मंगळवारी सांगितले की, पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर या तिघांशी बोलणार आहेत.

आशिया कप आणि वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निर्णय घेतला आणि त्यांना सांगण्यात आले की, राष्ट्रीय संघात त्याच्या सेवांची आता आवश्यकता नाही. या तिघांना सांगण्यात आले की, पीसीबीने निर्णय घेतला आहे की ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करतील, कारण त्यांनी मोहम्मद हाफिजची पाकिस्तान संघाचे संचालक आणि नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु पीसीबीला कळले की या तिघांच्या करारात असा कोणताही नियम नव्हता ज्यामुळे त्यांना एनसीएमध्ये कायमस्वरूपी काम करावे लागेल.

अधिका-याने सांगितले की, ‘मिकी आधीच डर्बीशायरसोबत आहे. पुटिक आणि ब्रॅडबर्न यांना नवीन जबाबदा-या मिळाल्या आहेत. त्यामुळे काही चर्चेनंतर कोणताही मतभेद न होता हे प्रकरण संपवून त्यांच्या करारातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या तिघांनाही बोर्ड काही महिन्यांचा पगार भरपाई म्हणून देणार असल्याचे त्यांनी मान्य केले.

अधिका-याने अशीही पुष्टी केली की, फलंदाजी प्रशिक्षक पुटिक यांनी करार स्वीकारण्यापूर्वी पीसीबीला अफगाणिस्तानसोबतच्या त्याच्या नवीन असाईनमेंटबद्दल माहिती दिली होती. त्याचप्रमाणे ब्रॅडबर्ननेही पीसीबीला कळवले होते की, इंग्लिश काउंटी ग्लॅमॉर्गन त्याला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू इच्छित आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR