सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वो पचार रुग्णालयामध्ये (सिव्हील) ओपीडी विभागात रुग्णांची गर्दी असते. त्यांना रांगेत थांबायला लागू नये, यासाठी बँकांप्रमाणे टोकन सिस्टम करण्याचा प्रयत्न राहील. ज्याचा नाव, नंबर स्क्रीनवर येईल त्याला बोलावले जाईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
ओपीडी विभागात रुग्णांची गर्दी असते. त्यांना रांगेत तिष्ठत थांबायला लागू नये यासाठी बँकांप्रमाणे टोकन सिस्टम करण्याचा प्रयत्न राहील. ज्याचा नाव नंबर स्क्रीनवर येईल त्याला बोलावले जाईल. उपचारासाठी आलेले रुग्ण त्यांच्यासाठी कक्षा बाहेर थांबतील. तिथे खुच्र्यांची व्यवस्था, पाणी, पंखा, उजेडाची सोय करण्यात येईल. याच ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर विविध शस्त्रक्रिया, विविध आजार त्यांची माहिती पहावयास मिळेल. तसेच घ्यावयाची काळजी याचे छोटे-छोटे माहितीपट दाखवण्यात येतील.
अनेकदा पेशंट कोणत्या विभागामध्ये दाखल आहे. याची माहिती नसते. नागरिकांना फिरावे लागते. तसेच या विभागातून त्या विभागात जावे लागते. लवकरच व्हाट्सअप सारखा नंबर उपलब्ध करून देण्यात येईल. यावर रुग्णाचे नाव किंवा अन्य माहिती टाकली तर तो रुग्णनक्की कोणत्या वार्डामध्ये उपचार घेत आहे. याची अद्ययावत माहिती मेसेज द्वारे संबंधितांना मिळू शकेल. यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर सोलापूरकरांचा विश्वास आहे.
रुग्णांना दिलासा देणारे हे हॉस्पिटल व्हावे या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. रुग्णालयाच्या आवारात शक्य तिथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी शक्य त्या सर्व सुविधा याम ध्ये शेड, बसण्याचे बाक, मार्गदर्शन कक्ष अशा सुविधाही लवकरच उपलब्ध होतील. या हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीन घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. सिटीस्कॅन घेण्याबाबत टेंडर काढण्यात येत आहे, असेही डॉ. संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केले.