तेलंगणाच्या भाविकांवर काळाचा घाला

किनवट/नांदेड : प्रतिनिधी
श्रावण मासानिम्मित महादेवाच्या दर्शनाला आलेल्या तेलंगणातील भाविकांवर सोमवारी सायंकाळी काळाने घाला घातला. सहस्त्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन परत जातांना तोटंबा घाटात चालकाचा ताबा सुटून जीप झाडावर आढळली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच तर चालकाचा उपचारासाठी नेतांना मृत्यू झाला. यासोबत अन्य सात जण गंभीर जखमी झाले. मयतामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील कुबेर मंडळा अंतर्गत येणा-या पार्डी येथील दहा ते बारा भाविक श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सोमवारी एपी २५ एएच ६७४७ क्रमांकाच्या कमांडर जीपने किनवट तालुक्यातील पर्यटन स्थळ सहस्त्रकुंड येथील धबधबा पाहण्यासाठी आले होते. तेथील प्रसिद्ध महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन घेऊन सायंकाळी त्याच कमांडर गाडीने परत गावी जात असताना किनवट तालुक्यातील तोटंबा जंगलातील घाटात चालकाचा भरधाव जीपवरील ताबा सुटल्याने जीप झाडावर जाऊन आदळली. या भिषण अपघातात जीपचा अक्षरश: चुरडा होऊन चौघाचा मृत्यू झाला.

तुम सायलू वय ६० वर्षे, तुम गोराबाई वय ६० वर्षे , आवला गंगाधर वय ५५ वर्षे यां तीघांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चालक तुळशिराम जाधव पाटील वय ३० वर्षे यांचा उपचारासाठी दवाखाण्यात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तेलंगणातील कुबेर येथील दवाखाण्यात हालवण्यात आले. अपघाताची तोटंबा गावच्या परिसरातील गावातील नागरिकांना माहिती कळताच त्या गावक-यांनी अपघात स्थळी धाव घेत मदत केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन,भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, किनवटचे विभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक रमेश जाधवर यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची सर्व माहिती घेतली. या अपघाताचीसर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news